residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

गुड न्युज....नाशिक बनलेय उद्यानांचे शहर

विनोद बेदरकर

नाशिक ः फुले आणि नाशिक एक वेगळंच नातं. मूळचे गुलशनाबाद आणि शेतीसाठी प्रसिद्ध असलेले "नाशिक' हे आता उद्यानांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून सुरू असलेल्या नानाविध प्रयत्नांमुळे शहरात तब्बल डझनभर पर्यावरणीय मॉडेल उभे राहिले आहेत. अल्पावधीतच उद्यानांची नवनवीन मॉडेल पाहण्याच्या निमित्ताने शहराची "उद्यानांचे नाशिक' अशी नाशिकची नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. 

तवली फाटा येथे शहरातील अद्‌भुत स्वरूपाचे उद्यान साकारले आहे. जेल रोडला सिंगापूर उद्यानाच्या धर्तीवर बारा एकरावर उद्यान प्रस्तावित आहे.

मियावाकी नवी प्रयोग

सातपूरचा वृक्षलागवडीचा देवराई प्रकल्प, एकलहरे गावात जपानी मियावाकी स्वरूपाचा प्रयोग उभा आहे. अशातच मध्य रेल्वेने नाशिक रोडला ऑक्‍सिजन पार्लर नावाने उद्यानाचा संकल्प सोडला आहे. जागोजागी नर्सरी गार्डन, गच्चीवरील उद्यान इथल्या निसर्गप्रेमाची साक्ष देतात. आयुर्वेद सेवा संघाचे वनौषधी उद्यान असो, की महापालिकेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी टाटा समूहाच्या मदतीने उभारलेले फुलपाखरू उद्यानापासून तर शहरातील वेगवेगळ्या विभागांतील कुसमाग्रज उद्यान, पंचवटीत रामसृष्टी, कानेटकर उद्यान, प्रमोद महाजन उद्यान, कलानगरचे आनंदसागर, नाशिक रोडचे सोमाणी गार्डन या अशा डझनभर पर्यावरणीय प्रयोगांनी समृद्ध आहे. 

जैवविविधतेचे पाच प्रयोग 
वृक्षारोपण आणि उद्यान अशा दोन स्वरूपात शहरात प्रयोग झाले आहेत. त्यात पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन सातपूर व म्हसरूळ अशा दोन ठिकाणी देवराईचे प्रयोगातून हजारो रोपे लावली आहेत. तब्बल पाच वर्षांपासून वीस हजारांवर झाडे दोन्ही ठिकाणी उभी आहेत. याशिवाय असाच प्रयोग एकलहरे परिसरात झाला आहे. मियावाकी प्रयोग जपानी पद्धतीने कमी क्षेत्रफळात जास्त प्राणवायू निर्माण करणारी दाट झाडे लावण्याचे प्रयोग एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्राने राबविला आहे. एकलहरे परिसरात पाच वर्षांपूर्वी व्यापक स्वरूपात झाडे लावून ती जगविली आहेत. तिसरा आयुर्वेद सेवा संघातर्फे वनौषधींचा प्रयोग केला आहे. जंगली झाड आणि झुडपांसोबत उपनगरला महापालिकेच्या जागेत असाच प्रयोग राबविला आहे. नानाविध प्रजाती टिकविण्यासाठी या पाचही प्रयोगांचे महत्त्व आहे. 

कल्पक उद्यानाची विविधता 
शहरात जुन्या पारंपरिक उद्यानांची संख्या मोठी आहे. मध्यवर्ती भागातील नेहरू उद्यान, गंगापूर मार्गावरील प्रमोद महाजन उद्यान, सातपूरचे वसंतराव कानेटकर उद्यान, नाशिक रोड परिसरात सोमाणी गार्डन, दुर्गा उद्यान, पंचवटीत रामसृष्टी उद्यान उभारले आहे. उद्यानांच्या शहरात नानाविध स्वरूपाचे प्रयोग यशस्वी ठरले आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने कुसुमाग्रज उद्यानातून काव्यप्रतिभा मांडली आहे. दिंडोरी मार्गावरील कलानगरला आनंदसागर उद्यानातून एलईडी, जॉगिंग ट्रॅक आणि एफएम रेडिओची सुविधा देत वेगळा प्रयोग आहे. यात राज ठाकरे यांनी टाटा समूहाच्या मदतीने बॉटिनिकल गार्डनचा प्रयोग केला आहे. बोलकी झाडे आणि फुलपाखरे ही येथील वैशिष्ट्य आहे. लेझर शोद्वारे झाडांच्या मनोगतातून संवादाचा प्रयोग येथे साकारला आहे. 

बापरे गंभीर आहे-आईवडील होते भगताच्या भरवशांवर पण....
प्रस्तावित उद्यान 
राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत महापालिकेतर्फे पेठ रोडवरील तवली फाटा येथे डोंगरावर उद्यान साकारण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. या उद्यानावरून शहराचा दक्षिण भाग पूर्णपणे नजरेच्या टप्प्यात येत असल्याने पर्यटकांचा ओघ येथे वाढला आहे. जेल रोडच्या राजराजेश्‍वरी मंगल कार्यालयाच्या बाजूला 12 एकर जागेवर सिंगापूरच्या धर्तीवर उद्यान उभारले जात आहे. नाशिक- पुणे महामार्गावरील गांधीनगर वसाहतीत अटल उद्यान साकारले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT