residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

बोहाड्याची शतकी परंपरा अन् घोंगडी उद्योगाचे गाव मोहाडी

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः शहरापासून 21 किलोमीटरवरील मोहाडी (ता. दिंडोरी) गावाचा अकराव्या शतकातील घोंगडी उद्योग प्रसिद्ध होता. गावात मेंढ्या मोठ्या प्रमाणात होत्या. धनगर गल्लीत घोंगड्या बनविल्या जात होत्या. जंगलव्याप्त गाव होते. मोहाची झाडे अधिक असल्याने गावाचे नाव पूर्वी मोहपल्ली होते. दहा हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाची मोहाडी आणि गणेशगाव अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. अलीकडे "पॉलिहाउस नगरी' आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे गाव म्हणून ओळखले जात आहे. 

    श्रीकृष्णाची अखंड शालिग्रामातील अष्टबाहू मूर्ती गावाच्या मंदिरात आहे. गावाला बोहाड्याची शतकी परंपरा आहे. गावात गोपालकृष्ण, कानिफनाथ आणि मोहाडमल्ल ही तीन ग्रामदैवते आहेत. गावाजवळून भागीरथी नदी वाहते. गावाला दोन वेस आहेत. गणपती, लक्ष्मीनारायण, सटवाई, शनी व हनुमानाची दोन मंदिरे आहेत. दोन बुद्धविहार आहेत. गावात दोन्ही बाजूने पायऱ्या असणारी अहिल्यादेवी होळकरकालीन बारव आहे. बारवेचे पाणी आजपर्यंत आटलेले नाही.

वाड्याची रचना वेगळीच

गावात पेशवेकालीन सोमवंशी वाड्या(गढी)चे अवशेष पाहायला मिळतात. पेशव्यांनी मोहाडीतील रहिवासी सोमवंशी कुटुंबाला सरदारकी दिली होती. सरदारांसाठी बांधलेली गढी दोन बुरुजाची असून, गढीच्या संरक्षक भिंतीवरून टांगा चालायचा. गढीच्या उजव्या बुरुजावर मशीद आहे. वाड्याची अवस्था बिकट आहे. ज्येष्ठ नेते एकनाथभाऊ जाधव यांनी राजकारणाची सूत्रे गावातून हलवली आहेत. 


जरूर वाचा- गुड न्युज नाशिक बनले उद्यानांचे शहर
व्याख्यानमालेची 64 वर्षांची परंपरा 
गावात तिन्ही ग्रामदेवतांचा यात्रोत्सव होतो. गावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, 64 वर्षांपासून व्याख्यानमाला होते. त्यासाठी बाळासाहेब भारदे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अरुण गुजराथी, प्र. के. अत्रे, पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यापासून "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्यापर्यंत अनेक जण गावात आले आहेत. मुक्ताबाई सोनवणे आणि रजनी जाधव या कीर्तनकार इथल्या. दोन भजनी मंडळे असून, भास्कर पाटील, नंदू ठाकूर, मुकुंद पाटील, प्रवीण पाटील, शंकर तिडके, उत्तम जाधव आदींचा त्यात सहभाग असतो.

एचएएलच्या सीआरसीएसमधून कामे

शरद मोगरे व विठ्ठल जाधव इथले प्रसिद्ध मल्ल आहेत. सुनील जाधव, राकेश जाधव, गणेश सोनवणे हे मल्ल आता स्पर्धा गाजवत आहेत. आठ अंगणवाड्या डिजिटल असून, पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची, पाचवी ते बारावीपर्यंतची माध्यमिक शाळा आहे. व्यायामशाळा व वाचनालय असून, शंभर वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह होतो. "एचएएल'च्या "सीआरसीएस' निधीतून ग्रामपंचायतीने शहराला लाजवतील अशी कामे केली आहेत. दहा सिमेंट बंधारे बांधले आहेत.

पुरस्कारामुळे हुरूप वाढला

   हागणदारीमुक्त, ग्रामस्वच्छता, डॉ. आनंदीबाई जोशी असे पुरस्कार गावाने मिळविले आहेत. हनुमान मंदिर आणि ई-अभ्यासिका, सभागृहाने गावाच्या वैभवात भर घातली आहे. श्रीकृष्णाच्या अखंड शालिग्रामातील अष्टबाहू मूर्तीच्या व्यवस्थापनासाठी छत्रपती शिवरायांचा कालखंड, पेशवे, इंग्रज व आता राज्य सरकारकडून मदत मिळते. अश्‍विनी देशमुख कराटेचे शिक्षण देत असून, बारा कराटेपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. 


ग्रामपंचायतीत पदवीधर प्रतिनिधित्व करतात. भविष्यात 15 गावांना एकत्रित करून मोहाडी क्‍लस्टर योजना विलास शिंदे आणि प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. 
- बाकेराव मौले, उपसरपंच 
.

गावाजवळील नदीवर घाट बांधून बोटक्‍लब सुरू करून पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 
- प्रा. कैलास कळमकर, पंचायत समिती सदस्य 

गावातील सूर्यवंशी वाडा आणि गोसावी समाधीजवळील दोन व इतर मंदिरांचा अभ्यास झाल्यास गावाचा इतिहास समोर येण्यास मदत होईल. 
- भास्कर जाधव, ग्रामस्थ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT