Cattle
Cattle 
उत्तर महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार तर एक वासरू गंभीर जखमी

रोशन भामरे

तळवाडे दिगर (नाशिक) : तळवाडे दिगरसह परिसरात काही खेड्यामध्ये डोंगरालगत राहणाऱ्या वस्त्यांवर बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याने परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. रात्री अपरात्री बिबट्याकडून हल्ले होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाला वारंवार पिंजरे लावण्याची मागणी करूनही सुस्त प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून तळवाडे दिगर परिसर व भवाडे रोड शिवारालगतच्या जंगलांमध्ये काही बिबट्यांनी घनदाट झाडीमध्ये सुरक्षित निवासासाठी जागा निवडली आहे. सायंकाळच्या वेळेस अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे डोंगरालगतच्या वस्त्यांवर येत असतात. कुठल्या न कुठल्या शिवारात बिबट्याची वार्ताही कानावर येत असते. दोन दिवसापूर्वी रात्री नऊ वाजेच्या सुमारास काशिनाथ झिप्रू आहिरे यांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केली. यावेळी घरातील पुरुष व महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याला आपली शिकार सोडून पळ काढावा लागला. मात्र नंतर जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाला. तर मंगळवारी (ता.१३) मध्यरात्री त्यांच्या शेजारी असलेल्या मुरलीधर सीताराम आहिरे यांच्या ४ वर्षाच्या वासराला देखील बिबट्याने गळ्याला दात लावून गंभीर जखमी केले आहे.

अहिरे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला शिकार उपाशी पोटी सोडून जावी लागल्याने त्याने गुरगुरत डरकाळ्या फोडत संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याचा हा थरार पाहण्यासाठी शिवारातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शेवटी ग्रामस्थांच्या आरडाओरडयामुळे व बॅटरीच्या तीव्र प्रकाश झोतामुळे संतप्त बिबट्याने नमते घेत दाट झाडीत पळ घेतला. शेळी व वासरू मालकाने मात्र बिबट्याचा हल्ला केव्हाही होईल या भीतीने जागते राहण्याचा निर्णय घेतला. घटनेनंतर शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले असता वनरक्षक हरी आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

परिसरात तात्काळ पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा वसंत ठाकरे, आनंदा भामरे, गोपाळा भामरे, भगवान भामरे, दौलत ठाकरे, अनिल आहिरे, बाळासाहेब पवार, तेजेस पवार, अण्णा जगताप, शरद ठाकरे, धीरज जाधव आदींसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT