Nashik News Whether Changing wave
Nashik News Whether Changing wave 
उत्तर महाराष्ट्र

हवामान खात्याकडून वादळाचा इशारा

सकाळवृत्तसेवा

निफाड : शुक्रवार (ता. 23 ) रोजी सकाळपासून 48 तासांकरिता हवामान विभागाने नाशिकसह अहमदनगर,जळगाव, धुळे, नंदूरबार भागात वादळाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे अावाहन निफाडचे तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांनी केले आहे 

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात वादळाचा धोका निर्माण होण्याचा संदेश दिला. त्यामुळे शेतकऱयांनी पाऊस गारपीट अतिवृष्टीपासून बचावासाठी आपला तयार शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच शेतमालाचे अधिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतमाल बाजारपेठेत आणला जाणार असेल किंवा तसे प्रयोजन असेल तर असा शेतमालही सुरक्षित ठेवावा. आकाशातील विजेपासून संरक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

मोकळे मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, वीजवाहिनी, विद्युत ट्रान्सफार्मरजवळ थांबू नये, गारपीट अतिवृष्टी यांपासून नुकसान टाळण्यासाठी वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत. जनावरांना योग्य व सुरक्षित ठिकाणी न्यावे. सर्व प्रकाराच्या विद्युततारा विद्युत खांबापासून दूर रहावे पाण्यातील विद्युत खांब तारा व विद्युत उपकरणांना हात लावू नये, कोणत्याही धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी जाऊ नये, धार्मिक यात्रा व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक व पर्यटकाने आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात त्याबाबत माहिती द्यावी 

अधिक‌ माहितीसाठी‌ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष यांच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क करण्याचे अवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षातर्फे निफाडचे तहसीलदार शिवकुमार अवळकंठे, नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर व प्रशासनाने  केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT