hire husband wife 
उत्तर महाराष्ट्र

नवापूरच्या हिरे दाम्प्त्यांची आगळी समाजसेवा 

विनायक सूर्यवंशी

नवापूर : आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेकजण सेवाभावी कामात योगदान देत असतात, मात्र आपली परिस्थिती जेमतेम असताना केवळ बेटी बचावच्या उद्देशाने प्रेरित होऊन नंतर समाजोपयोगी कामात गुंतवून घेतलेले अवलिया तसे फार कमी असतात. सलून व्यवसाय आणि कपडे शिवण्याचा व्यवसाय करणाऱ्या येथील प्रदीप व भाग्यश्री हिरे या दाम्पत्याने झोकून देत दीनदुबळ्यांसाठी मोफत स्वेटर आणि उबदार कपडे वाटप करीत आगळा आदर्श घालून दिला आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत त्यांनी झोपडपट्ट्यांत जात सुमारे सत्तर गरिबांना स्वेटरचे वाटप केले आहे. किमान दीडशे गरजूंना स्वेटर देण्याचा त्यांचा मानस आहे. 

सध्या कडाक्याची थंडी पडत असून उघड्यावर व झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांचे काय हाल होत असतील या भावनेने अस्वस्थ झालेल्या हिरे दाम्पत्यांनी थंडीत माणुसकीची ऊब देण्यासाठी बेटी बचाव अभियानांतर्गत पुढे सरसावले आहेत. गेल्या काही दिवसापासून हे पती पत्नी रात्री शहरात फिरून उघड्यावर व झोपडपट्टीत जाऊन गरजूंना स्वेटर वाटप करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाने गरजूंच्या लोकांचा चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. लहान मूल व वयोवृद्ध गरजू लोकांना स्वेटर देऊन माणुसकीचा हात बेटी बचाव अभियानाने दिला आहे. 

स्वखर्चाने बेटीबचाव अभियान 
हिरे दांपत्य हे मागील तेरा वर्षांपासून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कोणत्याही शासकीय व सामाजिक मदतीशिवाय स्वखर्चाने राबवीत आहेत. त्यांनी मुलींसाठी विविध स्पर्धा घेतल्या. बक्षीस देऊन मुलींचा आत्मविश्वास वाढवला. महाविद्यालयात जाऊन बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर जनजागृतीही ते करतात. दरवर्षी कस्तुरबा बालिका विद्यालयात महिला दिनाचे कार्यक्रम घेतात. 

गतवर्षी नवापूरमधील एका मुलीचे वडील वारल्याने तिचे दहावीचे शिक्षण थांबले होते. तिला रोख दहा हजाराची मदत करून तिचे शिक्षण पुन्हा सुरू केले. महिन्याच्या प्रत्येक गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी बालक बालिकांना सुवर्णप्राश नामक औषधाचे ड्रॉप घरोघरी जाऊन मोफत वाटप करतात. त्यांच्या कार्याची सामाजिक व शासकीय स्तरावर घेतली जावी अशी मागणी होत आहे 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT