Checkpoint Checkpoint
उत्तर महाराष्ट्र

नवापूर सीमा तपासणी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात !

नवीन धोरणानुसार टॅक्स ऑनलाइन वसूल केल्यास या नाक्यांची गरज राहणार नाही.

विनायक सुर्यवंशी

नवापूर : येथील आंतरराज्य सीमा (State boundary) तपासणी नाक्यावरील (Checkpoint) गैरप्रकार दिवसागणिक वाढत आहे. परिवहन विभागाचे (Department of Transportation) काही अधिकारी गैरप्रकारांना खतपाणी घालतात हे सर्वश्रुत आहे. नाक्यावर अनधिकृत वसुलीसाठी खासगी पंटर पूर्वीपासूनच असल्याच जुनेजाणते बेधडकपणे सांगतात, मात्र आता पंटर बाबत काही राजकीय मंडळींनी आरोप करत त्यावर सिक्का मोर्तब केला आहे. आरटीओ (RTO) आणि पंटर यांच्या मनमानी कारभारामुळे वाहन चाकांच्या नाकेनऊ आले आहे. या नाक्यावरील कारभार पूर्णपणे ऑनलाइन (Online) झाला पाहिजे तेव्हाच शासनाला (Government) पूर्ण महसूल (Revenue) मिळेल आणि वादविवाद संपुष्टात येईल.

(navapur state boundary checkpoint controversial)

नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील गैरप्रकार तात्काळ थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी, परिवहन मंत्री यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. परंतु या बाबतीत ठोस कारवाई न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस मधुकर नाईक यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला आहे.

महाराष्ट्र, गुजरात सीमावर्ती भागातील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांकडे कागदपत्र असल्यावरही पैशांची मागणी केली जाते. गैरप्रकार करण्याचे काम या नाक्यावर कार्यरत असलेले परिवहन विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी करत असल्याचा आरोप होतो. या नाक्यावरून चोवीस तासात अडीच हजारवर ट्रक मार्गस्थ होतात. ट्रक चालकांकडून अवैध मार्गाने लाखो रुपये वसूल केले जातात. असा आरोप केला जात आहे. नाक्यावर खासगी पंटर नेमले आहे. पैसे न देणाऱ्या वाहनचालकांना शिवीगाळ करून दर्जाहीन वागणूक दिली जाते. त्यामुळे तपासणी नाक्यावर सुरू असलेले गैरप्रकार तात्काळ थांबवून शासनाची दिवसाढवळ्या लूट करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी श्री. नाईक यांनी केली आहे. सीमा तपासणी नाक्यांवर पूर्वीपासून एडीसी (खाजगी पंटर) म्हणून स्थानिक काही जणांची नियुक्त आहेत. नाक्यावर अनेक वाद निर्माण होत असल्याने आता अधिका-यांनी स्थानिक खाजगी पंटर काढून बाहेरील पंटर मार्फत अवैध वसुली केली जात आहे. या वसुलीविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा काही युवकांच्या हस्ते बंदोबस्त केला जातो. सुरू असलेला हा सर्व गैरप्रकार प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर नाईक यांनी वारंवार पत्र व्यवहार केला. मात्र संबंधित विभाग, परिवहन मंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यावरून संबंधित विभाग प्रमुख, जिल्हाधिकारी व परिवहन मंत्री संशयाच्या घेऱ्यात आल्याशिवाय राहत नाही.

ऑनलाइन टॅक्‍स वसुलीची गरज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील आंतरराज्य सीमा तपासणी नाक्या बाबत धोरण जाहीर केले होते. नवीन धोरणानुसार टॅक्स ऑनलाइन वसूल केल्यास या नाक्यांची गरज राहणार नाही. हा भ्रष्टाचार होणार नाही, नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा त्रास कमी होईल व शासनाच्या तिजोरीत पूर्ण टॅक्स जमा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT