उत्तर महाराष्ट्र

कोरोणा लसीकरणा सोबत कापूस बियाण्यांची ही जनजागृती

कापूस पिक लागवड करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना सुधारित कापूस शेतकरी मार्गदर्शिका

सकाळ वृत्तसेवा


चिचपाडा :नवापुर तालुक्यातील चिंचपाडा व विसरवाडी विभागातील लुपिन फाउंडेशन, मार्फत कोरोना (corona) विषयी जनजागृती सोबत सुधारित कापूस (cotton) आदर्श पद्धती प्रकल्प विषयी जनजागृती मोहिम (Awareness campaign) सुरू केली.
(navapur taluka covid vaccination about cotton seeds awareness)

लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन मार्फत कोविड लसीकरण (Covid vaccination) व जनजागृती गावातील शेतकरऱ्यांना (Farmer) सुधारित कापूस आदर्श पद्धती विषयी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य मा. शैलेश दादा वसावे व माजी सरपंच मा.श्री राजू गोमा वसावे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखून अभियानाला सुरुवात करण्यात आले. चिंचपाडा येथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील २ वर्षापासून कापूस पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुधारित कापूस आदर्श पद्धती बीसीआय (BCI), जीआयझेड (GIZ) च्या अंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच लुपिन मार्फत कापूस पिक लागवड करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना सुधारित कापूस शेतकरी मार्गदर्शिका व खता विषयी माहितीपत्र वाटप करण्यात येत आहे.

एकूण ६९ गावांमध्ये जनजागृती मोहीम
चिंचपाडा व विसरवाडी PU मधील एकून ६९ गांवामध्ये एकून १०१८ शेतकर्यांना पर्यत जनजागृतीच्या अभियानातून शेतकर्यांना नोंदणी कृत बियाणे, खते, बालमजूर, आरोग्य, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी ( PPE कीट) बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घेणे, किटक नाशकासोबत दिलेल्या माहितीचे पालन करणे, जनतेच्या हितासाठी कोरोना लसीकरण व त्याची काळजी कशी घ्यावी, शेतीच्या कामात बालमजूर कायद्याने प्रतिबंध आहे, फवारणीच्या औषधांचे कॉकटेल, करू नका तसेच बीसीआयच्या मार्गदर्शक तत्वा नुसार प्रकल्पातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणाची उगवण क्षमता वाढवण्यासाठी, तसेच कीड रोगा पासून नियंत्रण होण्या करिता बीजप्रक्रियेचे महत्व पटवून सांगण्यात आले.

या अभियानामार्फात प्रत्येक दिवशी किमान १० ते १२ गावा मध्ये शेतकर्यांना जनजागृती केली जात असल्याची माहिती चिंचपाडा पी.यु. व्यवस्थापक श्री प्रशांत देसले व विसरवाडी पी यु व्यवस्थापक पराग नाईक यांनी दिली. सदर उपक्रम लुपिन फाउंडेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक श्री योगेश राऊत,प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, प्रकल्प प्रमुख सुनील सैंदाणे,प्रशिक्षण समन्वयक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबण्यात आला. चिंचपाडा व विसरवाडी ह्या दोन्ही पियूच्या कृषी मित्रांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT