उत्तर महाराष्ट्र

साहेब, गावकऱयांच्या जीव वाचविण्यासाठी बिबट्याला पकडा हो !

विनायक सुर्यंवशी


नवापूर : काळंबा शिवारात मुक्त फिरणा-या बिबटयास व बछडयांना जेरबंद करावे. रोज रात्री बिबट्याचा वावर काळंबा परिसरात वाढला आहे. या हिंस्त्र वन्य प्राण्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दोन पिलांसह बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे पालिका हद्दीतील काळंबा गावातील रहिवाशांनी वन क्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्याकडे केली, यावेळी काळंबा गावातील रहीवासी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

निवेदनाचा आशय असा, काळंबा गावाच्या परिसरात एक बिबटया व त्याचे दोन बछडे आमच्या निदर्शनास आले आहेत. बिबट्या व त्याचा परिवार रोज कुत्रे, कोंबडया, बकरे यांना उचलून घेऊन जाऊन ते  फस्त करत आहेत.  भविष्यात असेच सुरु असल्यास मानवी जिवनाला देखील धोका उदभवू शकतो. वन विभागाकडून सदर बिबटयाला जेरबंद करण्यात यावे, जेणेकरुन आम्हा गावक-यांच्या जिवीतास धोका राहणार नाही. गावक-यांची जीवितहानी होणार नाही याचा विचार करुन योग्य ती शासकीय कार्यवाही करुन सदर बिबटयाला पकडण्यात यावे. असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर आंतराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सचिव रमेश गावीत,  गावकरी सुनिल मावाची, आवेश गावीत, राहुल गावीत, अनमोल गावीत, रतिलाल गावीत, संजय गावीत, सुकलाल गावीत, उसमान गावीत, राजेश गावीत, जगदीश गावीत सह ५२ ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.

 पूर्वानुभव 
२०१७ मध्ये अशा प्रकारची घटना काळंबा गावात घडली होती. त्यावेळी पण बिबटयाने कोंबडया,बकरे,कुत्रे  उचलुन घेऊन जाण्याच्या प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे काळंबा गावातील ग्रामस्थ भयभीत झाले असुन वनविभागाने या बिबटचा लवकरात लवकर बंन्दोबस्त करावा यांची मागणी केली आहे.


संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT