residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

मरणाने केली सुटका, पण मोक्षासाठी छळ 

एस. डी. आहिरे ः सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या विधींपैकी दशक्रिया विधी करण्याचे ठिकाण निफाड तालुक्‍यातील बहुतांश गावांत असुविधांनी ग्रासले असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. कदाचित मृतात्मेही वैतागल्यामुळे मरणाने केली सुटका, पण मोक्षप्राप्तीसाठी प्रशासन छळत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करत असतील. बहुतांश ठिकाणी उघड्यावर दशक्रिया विधी उरकावा लागत असल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. 

निफाड तालुक्‍यात थेरगाव, गोरठाण येथे दशक्रिया विधी शेड नसल्याने खासगी जागेत विधी उरकावा लागतो. तालुक्‍यातील बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. विधीसाठी येणाऱ्या नातलगांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहेरगावहून आलेल्या पाहुणेमंडळींना नाक मुरडत नाराजी व्यक्त करतानाचे दृश्‍य वारंवार दिसून येते.

शेडची दुरवस्था,पाणीही नाही....

    कोठे दशक्रिया विधी शेडची दुरवस्था, तर कोठे पाण्याची व्यवस्था नाही. दशक्रिया विधी ठिकाणच्या परिसरात दुर्गंधी सहन करावी लागते. आलेल्या पाहुण्यांना बसण्यासाठी उभारलेल्या शेडच्या छताचे पत्रे गायब झाल्याने उन्हात बसण्याशिवाय पर्याय नसतो. दशक्रिया विधीसाठी बनविलेले कठडे पूर्णत: मोडकळीस आल्याने त्यांचा वापर करता येत नाही. जे विधी करणाऱ्यांनाही बसण्याची कसलीही सोय नाही. अस्वच्छता असल्याने अनेकदा जे विधी करण्यास येतात त्यांनाच स्वच्छता करावी लागते. दशक्रिया विधी शेडकडे जाणारे रस्तेही उखडलेले आहेत. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 
 
या आहेत नागरिकांच्या अपेक्षा... 
दशक्रिया विधीस्थळी पूर्णवेळ स्वच्छ पाण्याची उपलब्धता असावी, विधीदरम्यान अनेक जण भजन अथवा प्रवचनाचे आयोजन करतात. यासाठी वेगळे छोटे व्यासपीठ असावे, आवश्‍यक सुविधांनीयुक्त सभागृह असावे, विधीसाठी बसण्याची, विधीचे साहित्य मांडण्यासाठी आणि विधीस बसणाऱ्यांसाठी आसनव्यवस्था असावी, सर्वसोयींनीयुक्त स्वच्छतागृहे असावीत, अस्थिविसर्जन कुंड, सुसज्ज पार्किंग व्यवस्था असावी, या परिसराचे नियोजनपूर्वक सुशोभीकरण व्हावे, तसेच विविध प्रकारची शोभेची व सावली देणारी झाडे लावावीत. 


थेरगाव येथे दशक्रिया विधी खासगी जागेत उरकावा लागतो. नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न प्राधान्याने सोडवायला हवा. 
-आनंदराव बोराडे, माजी संचालक, निसाका 

कसबे सुकेणे गटातील सर्व गावांमध्ये अद्ययावत दशक्रिया विधी शेड उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेतून मूलभूत सुविधांतर्गत निधी मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. 
-दीपक शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT