उत्तर महाराष्ट्र

अमरिशभाई पटेल यांच्या विजयानिमित्त निजामपूर-जैताणेत जल्लोष 

भगवान जगदाळे

निजामपूर : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत धुळे-नंदुरबार मतदारसंघातून माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांचा दणदणीत विजय झाल्याचे समजताच माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी दहाला बसस्थानक, खुडाणे चौफुली व मेन रोडवरील आझाद चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह विजयी घोषणा दिल्या. 

वाचा- पन्नाशीपार पुंडलिक भामरे यांची तरुणाईला लाजविणारी ऊर्जा 

भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजितचंद्र शाह, दशरथ शेलार, पंचायत समिती सदस्य सतीश वाणी, तालुका उपाध्यक्ष मगन जाधव, निजामपूर शहराध्यक्ष महेंद्र वाणी, सरचिटणीस श्‍याम शाह, अभिजित भावसार, सुधाकर माळी, सुनील भावसार, किरण महाजन, केवबा बच्छाव, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच अजितचंद्र शाह व शहराध्यक्ष महेंद्र वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. 


दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, विलास बिरारीस, सचिन दहिते, उत्पल नांद्रे, म्हसाई ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदुलाल जाधव व उद्योजक ललित आरुजा यांनी धुळे येथील एसव्हीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार अमरिशभाई पटेल यांचा सत्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. शरदचंद्र शाह, सुरेश पाटील, ॲड. संभाजी पगारे, हर्षवर्धन दहिते, लीला सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रा. सविता पगारे, पिंपळनेर मंडलाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, साक्री मंडलाध्यक्ष वेडू सोनवणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, संजय खैरनार, तालुका उपाध्यक्ष वासुदेव बदामे, ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, प्रदीप नांद्रे, मोहन ब्राह्मणे, मुकेश पाटील, कन्हय्यालाल काळे आदींनी श्री. पटेल यांचे अभिनंदन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT