residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

रिक्तपदे भरण्यास शासनाची नकारघंटा

सकाळवृत्तसेवा

नाशिक- महापालिकेच्या महसुली खर्चात वाढ झाल्याने राज्य शासनाने रिक्त पदे भरण्यास यापुर्वीचं बंदी घातली आहे. परंतू अति महत्वाच्या सेवांमधील पदे भरण्याची महापालिकेने केलेल्या विनंतीला शासनाने उत्तर न दिल्याने गेल्या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा स्मरणपत्र देण्यात आल्याने शासनाकडून रिक्त पदे भरण्यास सातत्याने नकार घंटा मिळतं असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेत पुर्वी 7002 पदांचा आकृतीबंध मंजुर करण्यात आला आहे. परंतू त्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्याची विनंती शासनाकडे यापुर्वी करण्यात आली होती. परंतू महसुली खर्च चाळीस टक्‍क्‍यांच्या वर गेल्याने तो 35 टक्‍क्‍यापर्यंत आणावा अशा सुचना देत शासनाने रिक्त पदांच्या भरतीला नकार दिला होता. याच दरम्यान शहराची वाढती लोकसंख्या व महापालिकेला ब वर्ग दर्जा मिळाल्याने 14 हजार पदांचा नवीन आकृतीबंध तयार करून शासनाकडे सादर झाला. 

पुर्वीच्या रिक्त पदांच्या भरतीची मागणी व नवीन आकृतीबंध अशा दोन्हींवर शासनाकडून अद्याप उत्तर आले नाही. तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस शासनाला रिक्त पदे भरता येत नसली तरी अति महत्वाच्या अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभागातील पदे भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. एकदा स्मरण पत्र दिल्यानंतर गेल्या आठवड्यात विद्यमान आयुक्त गमे यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्र देत अग्निशमण विभागातील 54, वैद्यकीय विभागातील डॉक्‍टरांची 24 पदे आरोग्य विभागातील महत्वाची पदे भरण्यास परवानगी देण्याची मागणी करणारे स्मरणपत्र सादर केले आहे. शासनाने अर्थ विभागाच्या परवानगीनंतर निर्णय घेण्याचे आश्‍वासन देत वेळकाढुपणा केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT