residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पंचायत समिती आरक्षण पडले पण उमेदवारांचा मात्र वाणवा-- कुठे सोय कुठे गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाच्या सोडत झाली. सोडतीत येवला समिती सभापतीपदासाठी आरक्षण निघालेल्या अनुसुचित जमाती महिला उमेदवारच नसल्याने या ठिकाणी फेर सोडत घ्यावी लागणार का ? हाही प्रश्‍न कायमच आहे. एकुणच, कुठे सोय तर कुठे मात्र गैरसोय अशी स्थिती उद्भवणार आहे. 

नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी निलेश श्रिंगी यांच्या उपस्थितीत सकाळी दहाला नियोजन भवनात पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढण्यात आल्या. त्यात येवला, नाशिक व बागलाण पंचायत समितीत सभापतीपदासाठी उमेदवार तरी मिळतील का ? अशी शंका आहे. अशा पध्दतीचे सोडत चिठ्या निघाल्या. तर अनेक ठिकाणी सभापतीपदासाठी इच्छूक असलेल्यांचा भ्रमनिरासही झाल्याचे पहायला मिळाले. 

येवला आले चर्चेत 
येवला पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. मात्र या ठिकाणी अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्याने प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नाशिक पंचायत समितीत महिला उमेदवारासाठी राखीव आहे. त्यामुळे येथे अनपेक्षित लॉटरीचा अनुभव येउ शकतो. त्यामुळेच आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील महिला उमेदवारच न मिळाल्यास फेर आरक्षण घ्यावे लागणार का ? असाही प्रश्‍न आहे.

आणि हरकत घेतली

सोडतेवेळी उपस्थित इच्छुकांनी 1995 पासून आरक्षण ग्राह्य धरून त्यावर सोडत काढण्यास हरकत घेतली. मात्र, अपर जिल्हाधिकारी सागर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या निकषात तसेच 1995 नव्हे तर 1996 पासून आरक्षण तपासण्यात आल्याची माहिती दिली. नाशिक व सिन्नरचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याची घोषणा होताच इच्छूकांनी सभागृहातच आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, शासकीय कन्या विद्यालयातील अल्फीया रसुल शेख व दीक्षा रोकडे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींनी आरक्षण सोडतीची चिठ्या काढल्या 


अनुसूचित क्षेत्राबाहेरील पंचायत समिती आरक्षण 
आरक्षित सभापती संख्या पंचायत समिती 
अनुसुचित जाती 01 चांदवड 
अनुसुचित जमाती 01 देवळा 
अनुसुचित जमाती (महिला) 01 येवला 
नागरिकांचा मागास प्रवर्ग 02 मालेगाव, नांदगाव 
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 02 सिन्नर, नाशिक 
सर्वसाधारण महिला 01 निफाड 

अनुसुचित क्षेत्रातील पंचायत समिती आरक्षण 
प्रवर्ग पदांची संख्या आरक्षित पंचायत समिती 
अनुसुचित जमाती 03 इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व पेठ 
अनुसुचित जमाती (महिला) 04 दिंडोरी, कळवण,बागलाण, सुरगाणा 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT