उत्तर महाराष्ट्र

योगसाधनेतुन पोलिसांचा मनोबलाचा ध्यास !

संजय पाटील

पारोळा : कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करित आहे.सामुहीक एकजुटीतुन शहरात एकमुखी निर्णयाची अंमलबजावणी केली जाते.ही बाब विशेष मानावी लागेल.वैद्यकिय,पालिका व महसुल विभागील अधिकारी व कर्मचारी हे प्रामाणिकपणे कोरोना संकटाचा मुकाबला करित आहे.अश्या कठीण परिस्थितीत पोलिस प्रशासन देखील आपली भुमिका अगदी चोख पणे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निभावत आहे. अश्या परिस्थितीत पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती व मनोबल वाढविण्यासाठी योग शिक्षक तथा किसान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विकास सोनवणे यांनी योगाचे धडे देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.पोलिसांचे योगसाधनेतुन अशा प्रकारे सेवा देणारे हे पहीलेच योगशिक्षक असण्याची शक्यता आहे.त्यांच्या सेवाभावी कार्याचे अनेकांनी कौतुक व गौरव केला आहे.

येथील योगशिक्षक विकास सोनवणे गेल्या अनेक वर्षापासुन सेवानिवृत्तीनंतर सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना योगाचे धडे देत मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करित आहेत.तालुक्यातील प्राथमिक शाळेत जावुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक संगोपन बरोबर मानसिक व शाररिक मनोधैर्य वाढविण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे.
तसेच शहरातील गरजु व योगसाधनेशी जुळलेल्या व्यक्तींना ते सकाळ व संध्याकाळ वेगवेगळे प्राणायम शिकवत असल्याने अनेकांनी योगसाधनेतुन शरीरातील अनेक विकारांवर विजय मिळविला आहे.

पोलिस कार्यालयतच योगसाधना 
प्रत्येक पोलिस कर्मचारी किंवा अधिकार्यास योगसाधनेचे महत्व,त्यातील फायदे व शाररीक तंदुरुस्ती बाबत योगशिक्षक सोनवणे यांनी पोलिस कार्यालयात अनेक योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यामुळे अनेकांनी बारकाईने या योगसाधनाबाबत माहीती घेत मिळेल त्या वेळात योग करित आपली प्रतिकारक शक्ती वाढवित आहे.

योग शिक्षकाच्या सेवाभावी कार्याचे अनेकांकडुन कौतुक 
कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीत जो तो आपले आरोग्य सांभाळत दैनंदिन कार्य करित आहे.मात्र कोरोना योध्दांचे मनोधैर्य उंचावले जावे,त्यांच्यातील  शाररीक व मानसिक तंदुरुस्तीस वृध्दी मिळावी.या भावनेपोटी योग शिक्षक विकास सोनवणे हे आपल्या परिने या कठीण काळात योगाचे धडे सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.पोलिसांसह इतर कोरोना योध्दांना ते योगसाधना शिकवित असल्याने अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा,यासाठी प्रशासन आपल्या परिने कार्य करित आहे.सामाजिक बांधिलकीतुन योगसाधनेच्या अनुभव व त्यातुन वाढणारे मनोबल लक्षात घेता रात्रंदिवस खडा पहारा देणारे पोलिस कर्मचारी यांची प्रतिकारक शक्तीत वाढ व्हावी.योगाच्या अनेक प्राणायमातुन मनोधैर्य उंचावले जावे हा हेतु ठेवत हे कार्य केल्याचे समाधान आहे.
विकास सोनवणे,योगशिक्षक तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य किसान महाविद्यालय,पारोळा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT