उत्तर महाराष्ट्र

पारोळ्यात अहीराणी गाण्यातुन कोरोनाबाबत जागृती 

संजय पाटील

पारोळा : कोरोना च्या संसर्ग वाढु नये यासाठी शासनाकडुन उपाययोजना राबविल्या जात आहे.परंतु आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेपोटी येथील संगीतकार,गायक राजु साळुंके यांनी कोरोना विषाणुच्या पाश्वभुमीवर अहीराणी गीतातुन लोकांना घरीच बसण्याचे आवाहन केले आहे. या अहीराणी गीतातुन कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव किती भयावह आहे. व त्यासाठी बाहेर न पडता घरीच थांबण्याचे आवाहन त्यांनी गीताच्या माध्यमातुन केले आहे.

सध्या संपुर्ण भारतासह इतर देशात कोरोना विषाणुने हाहाकार केला आहे.केंद्र सरकार व राज्यसरकार रोजच नवनवीन आदेश जारी करित लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करित आहे.तरी देखील नागरीक हे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करतांना दिसत आहे.पालिका,पोलिस व महसुल प्रशासन आपल्या परिने सर्वोतोपरी उपाययोजना राबवित आहे.नागरिकांनी गर्दी न करता घराचत कुटुंबासोबत राहण्याचे आवाहन केले जात आहे.

"उना कथानी व्हायरस आजार भारत मा हाऊ कोरोना " या पहील्या ओळीतुनच कोरोना हा संसर्ग जन्य आजार असुन आपण एका ठिकाणी गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करावे.अशी आर्तहाक ते आपल्या गीतातुन देत असल्यामुळे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभर या अहीराणी गीताचे कौतुक होत असुन सोशल मिडीयावर या गीतास अनेकांनी पसंती दर्शनवुन अनेक गृपवर ते व्हायरल होतांना दिसत आहे. साम टि व्हीवर देखील या गिताचे बोल नागरिकांना ऐकविण्यात आले आहे.

कोरोना बाबत जनजागृती होऊन प्रशासनास मदत व्हावी.ह्या हेतुने अहीराणी गीतातुन लोकांना आपण घरी राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन घरी थांबावे.
राजु साळुंके,पारोळा 
संगीतकार,गीतकार व गायक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT