deewa 
उत्तर महाराष्ट्र

अंधश्रद्धेतून निंबाच्या झाडाखाली दिवे अन्‌ पूजा 

भरत बागूल

पिंपळनेर ः एकविसाव्या शतकात जगाने विज्ञानाची कास धरत प्रगतीच्या दिशेने झेप घेतल्यानंतरही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना कुठे ना कुठे घडतच असतात. अशाच अंधश्रद्धेतून सोमवारपासून धुळे शहरासह जिल्हाभरात सोशल मीडियावरून अफवा फोफावली असून, मुलांच्या मृत्यूच्या भीतीने महिलांकडून निंबाच्या झाडाखाली दिवे लावण्यासह पूजा केली जात आहे. 
नंदुरबार जिल्ह्यात एका तृतीयपंथीयाची हत्या झाली असून, त्याने शाप दिल्याने मुलांचा मृत्यू होणार असल्याच्या भीतीतून ज्याला एक मुलगा असेल त्यांनी एक कणकेचा दिवा, तर ज्याला दोन मुले असतील त्यांनी दोन कणकेचे दिवे निंबाच्या झाडाखाली लावून पूजा करण्याची अफवा सोशल मीडियावरून पसरली. कुणी "कोरोना'च्या अफवेची झालर लावत आहेत. 
या अफवेमुळे कालपासून धुळे शहरासह जिल्हाभरात समस्त महिलांतर्फे निंबाच्या झाडाखाली कणकेचे दिवे लावण्यात येत असून, पूजाही करण्यात येत आहे. त्यात सुशिक्षित महिलांचाही सहभाग होता, हे विशेष. धुळे तालुक्‍यातील नगावसह सोनगीर परिसरातील महिलांनीही निंबाच्या झाडाखाली दिवे लावले. परिणामी जमावबंदी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, केवळ घरातच बसा. एक तासाच्या अंतराने हात-पाय तोंड पाण्याने स्वच्छ धुवा, आपणच आपले रक्षक बना. कोणतीही अंधश्रद्धा पसरेल, असे कृत्य करू नका. "मेसेज'ही फॉरवर्ड करू नका, तसे केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. विवेकी व विज्ञानवादी व्हा, असा सल्ला "अंनिस'चे जिल्हा कार्यवाह सुभाष जगताप यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT