pink village gulabvadi
pink village gulabvadi 
उत्तर महाराष्ट्र

Video "पिंक सिटी' नव्हे आमचे "पिंक व्हिलेज' पहा... 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : डोंगराळ भागात वसलेले गुलाबवाडी (ता. रावेर) हे पाचशे लोक वस्तीचे गाव. नावाप्रमाणेच हे गाव गुलाबी व्हावं! तसेच "एक गाव, एक गणपती' संकल्पनेप्रमाणेच "एक गाव, एक रंग' या संकल्पनेतून "पिंक व्हिलेज'ची निर्मिती होतेय. यामुळेच म्हणावे लागणार जयपूर या "पिकं सिटी' प्रमाणे आमचे अनोखे "पिंक व्हिलेज'. 

देशात "पिंक सिटी' म्हणून जयपूर शहराची ओळख आहे. त्याचप्रमाणे आपले गावही "पिंक व्हिलेज' म्हणून ओळखले जावे, यासाठी पुनखेडे (ता. रावेर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जितेंद्र गवळी यांना कल्पना सुचली ती, गुलाबवाडी गाव नावाप्रमाणेच गुलाबी करण्याची. त्यांनी ग्रामस्थांना ही संकल्पना समजावून सांगितली, तेव्हा सुरुवातीला अनेकांचा विरोध होता. परंतु सर्वांना आगळी वेगळी संकल्पना कळल्यावर सर्वांनी एकजुटीने यात सहभाग घेतला. गावातून लोक वर्गणी जमा करत लोक सहभागातून आदर्श गुलाबी गाव तयार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

तरूणांनी टीम केली उभी 
पाचशे घरांचे गाव असलेले गुलाबवाडी हे गाव नावाप्रमाणे गुलाबी करण्याची संकल्पना जितेंद्र गवळी यांनी पुढे आणली. यासाठी प्रत्येक घरातून पाचशे रूपये घेवून लोकवर्गणी जमा केली. तसेच घरांना रंग देण्यासाठी गावातीलच पंधरा तरूणांची टीम तयार केली. या तरूणांना गावातील प्रत्येक घराच्या भिंती अन्‌ कंपाउंड वॉल देखील गुलाबी झाली. यामुळे गावात प्रवेश करताच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळतेय. 


आणखी काही उपक्रम 
- सेंद्रिय शेतीची अंमलबजावणी. 
- स्वच्छ व सुंदर गाव -स्वच्छता अभियान 
- गावात शुद्ध पेयजल व्यवस्था. 
- पर्जन्य मापक यंत्राद्वारे गावात दैनिक नोंद. 
- वाचनालय व ग्रंथालय यांची व्यवस्था केली जाणार. 
- तरुणांसाठी व्यायाम शाळेची निर्मिती केली जाणार. 
- गावात प्राथमिक आरोग्याच्या सुविधा दिल्या जातील. 
- ओला व सुका कचऱ्याची विभागणी करून खत निर्मिती करणार. 
- प्लॅस्टिक बंदी, हुंडा बंदी, कुऱ्हाड बंदीसारखे प्रयोग राबविणार. 
- गुलाबी गावाच्या सोबतीने वृक्ष लागवड करून हिरवेगार गुलाबवाडी गाव केले जाणार. 
- घराच्या भिंतीवर बेटी बचाव बेटी पढाव, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल असे सुविचार लिहिले जाणार आहेत. 

ब्रम्हलीन संत लक्ष्मण चैतन्य बापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलाबवाडी या गावाला पिंक व्हिलेज बनवून बापुजींना सर्व गुलाबवाडीकर श्रध्दांजली वाहणार आहोत. बापुजींचा सुध्दा गुलाबी रंग आवडीचा होता, आश्रमात येणारे सर्व चैतन्य साधक परिवाराचा गणवेषाचा रंग ही गुलाबीच आहे. 
- जितेंद्र गवळी, शिक्षक पुनखेडे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT