live
live 
उत्तर महाराष्ट्र

कसारा घाटात अंत्योदय एक्सप्रेसचा डबा घसरला,प्रवासी सुखरूप,वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहरः मध्य रेल्वेच्या कसारा घाटात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मुबंईहुन गोरखपुरला जाणाऱ्या अंत्योदय एक्सप्रेसच्या डाउन रेल्वे मार्गावरील एक्सप्रेसचा एका डब्याचे रुळावरून चाक घसरल्याची घटना घडली. कसारा घाट माथ्याच्या वळणावर भीमा 2 पुलावर ही घटना घडल्याने गाडीत प्रवास करणारे प्रवासी भयभीत झाले. 

  या अपघातामुळे सकाळी मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तर सकाळच्या सुमारास दोन्ही मार्गावरील गाड्या एक ते दिड तास उशिराने धावत होत्या.
 गुरूवारी पहाटे मुंबईहुन गोरखपूरला जाणारी अंतोदय एक्सप्रेस क्रमांक (12598) हि कसारा रेल्वे सोडल्या नंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमा 2 पुलावर पहाटे चारच्या सुमारास आली असता मोठा आवाज झाला.यामुळे साखरझोपेत असलेले प्रवासी जागे झाले. गाडीच्या शेवटून दुसरा डबा रुळावरून घसरत आल्याचे लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत गाडी थांबवली.या अपघातामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती होताच आपत्कालीन यंत्रणेला बोलविण्यात आले.यावेळी रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप व मिडल मार्गाने वळविण्यात आल्या असुन गाडी पुलावरून बाजुला करण्याचे काम युध्द पातळीवर दुपारपर्यंत सुरू होते.पुलावर काम करण्यास यंत्रणेला फारच जिकिरीचे झाले होते.कारण पुलाच्या दोन्हीही बाजुला खोल दरी असल्यामुळे कामगारांना काम करतांना अडचणीला सामोरे जावे लागत होते.

या घटनेlतील प्रवाशांसाठी पर्यायी गाडीची रिलीफ ट्रेनची व्यवस्था करण्यात आली.सकाळी 11 वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकातुन प्रवाशांना पर्यायी गाडीने गोरखपूरला रवाना  करण्यात आले. सोय करण्यात आली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास गाडीचे मागील 2 डबे पुलावरच ठेऊन अपघात ग्रस्त गाडी इगतपुरी स्थानकावर आणण्यात आली. .

मोठी दुर्घटना टळली...
इगतपुरी ते कसारा घाट रेल्वेमार्ग हा अवघड वळनाचा आहे. प्रवासात लागणारे बोगदे, पूल यामुळे नेहमीच कसारा घाट चर्चेत आहे.त्यातच भीमा 2 पुलावर झालेली घटना धक्कादायक आहे.डबा घसरला असे ऐकले तर भीती वाटणारा हा प्रसंग.जर, डबा पुलाच्या खाली पडला असता तर काय झाले असते या विचारानेच अनेकांच्या चेहऱ्यावर भय दिसत असल्याचे चित्र घटनास्थळी होते.दैव सोबत होते म्हणून वाचलो असे सांगत प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT