residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

"वाईन'"पैठणी'चा  अभ्यासक्रमात समावेशासाठी प्रयत्नः राजेश पांडे 

श्रीकृष्ण कुलकर्णी

नाशिक  धार्मिक,पौराणिक,पर्यटकांचे शहर असलेले नाशिक आता वाईन सिटी म्हणून जगभर परिचित आहे. येथील पैठणीहीची वेगळीच छाप आहे त्यामुळे कौशल्य विकासावर आधारीत या दोन्ही अभ्यासक्रमांच्या तंत्र,प्रक्रीया ते प्रत्यक्ष बाजारपेठेची उपलब्धता यात मोठे बदल होत आहे. असा द्राक्ष,वाईन,पैठणीवर आधारीत विषयांचा अभ्यासक्रमात नव्याने समावेश करत असून येत्या शैक्षणिक वर्षात अमंलबजावणीसाठी प्रयत्न राहिल. अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि नॅशनल युवा को-आँपरेटिव्ह सोसायटी( एनवायसीएस) चे चेअरमन राजेश पांडे यांनी "सकाळ'ला दिली. येत्या दोन ते तीन वर्षात विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र सर्वांर्थाने सक्षम करू,त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. स्वतंत्र स्टाफही उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.असेही ते म्हणाले, 

नाशिक दौऱ्यावर आलेल्या श्री.पांडे यांची भेट घेतली असता त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील मुद्यांसह विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, विद्यापीठ केवळ पदवी देणारी फॅक्‍टरी नको तर बहुआयामी व्यक्तीमत्व घडविणारी आणि संधी देणारे ते व्यासपीठ व्हावे ही इच्छा आहेत.त्यासाठी कौशल्यविकासाला आम्ही प्राधान्य दिले आहे. उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना लागणारे मनुष्यबळ,तंत्रज्ञान उपलब्धतेवर भर राहणार आहे. नासिकचे द्राक्ष,कांदे,जळगावची केळी,कोकणातील आंबा,मासे,नागपूरची संत्री यात दिवसागणिक बरेच संशोधन होऊ लागले आहे. केवळ बी.ए,बी.कॉम,बी.एस्सी अशी फॅक्‍टरी न राहता माहीतीची सर्व कवाडे अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना खुली करून दिली जाईल. त्यासाठी शिक्षणात आमुलाग्र बदल करण्याची गरज असून चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम(सीबीसीएस) नुसार विद्यार्थ्यांना हे विद्यापीठात उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना हवे ते प्रशिक्षण,अभ्यासक्रमांची निवड करता येईल. 

स्थानिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना 
विद्यार्थ्यांच्या स्थानिक गरजां वेगळ्या असतात.पण ते उगीचच काहीही अभ्यासक्रमांची निवड करतात,मग रोजगाराअभावी सारे आडत असे सांगून ते म्हणाले, हे लक्षात घेऊनच द्राक्ष,कांदा,पैठणी व त्या-त्या भागातील महत्व लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना असेल. नाशिक विस्तारत असून हे पुणे विद्यापीठावर अवलंबून न राहता स्वतंत्र सक्षम केंद्र करण्यावर आमचा भर आहे. महापालिकेच्या स्वतंत्र शाळेत आम्ही स्थलांतर होत आहोत,शिवाय बांधकाम परवानगी मिळाली आहे. 

अभ्यासक्रमांची संख्या वाढवणे नव्हे... 
ते म्हणाले, केवळ अभ्यासक्रमांची संख्या वाढवणे हा आमचा उद्देश नाही. जास्त अभ्यासक्रमांमुळे परिक्षा घेतांना गोंधळ उडतो. सारे नियोजन अयशस्वी होते. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या चूकीच्या नियोजनामुळे काय फजिती झाली. हे सर्वश्रृत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सर्व बाबींचा विचार करूनच नवीन उपक्रम आम्ही राबवत आहोत. विद्यार्थी कल्याण मंडळ,एनएसएसद्वारे विद्यार्थ्यांची सामाजिक संवेदना जागृत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना जे.आर.डी टाटा फेलोशिप,गरीब विद्यार्थ्यांसाठी तसेच विद्यार्थींनीसाठी स्वतंत्र शि÷ष्यवृत्ती सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT