उत्तर महाराष्ट्र

आजूबाजुला तीनशे "कोरोना' बाधीत रुग्ण...तरी ती धैर्याने देतेय वैद्यकीय सेवा ! 

दिलीप वैद्य

रावेर : गावांत किंवा गल्लीत कोरोनाचा एकादा पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे कळल्यावर कोणी घराबाहेर देखील निघत नाहीत, पण रुग्णालयात आजूबाजूला ३०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असताना धैर्याने त्यांची सेवा ही देशसेवा समजून एक खानदेश कन्या मुंबईत करतेय. होय, साकेगांव (ता. भुसावळ) येथील माहेर आणि रेंभोटा (ता. रावेर) येथील सासुरवाडी असलेल्या नयना पाटील यांच्या सेवेची ही कथा थरारक तितकीच प्रेरक आहे. 

कोरोना विषाणू विरुद्ध सारेच विश्व एक दिलाने लढत आहे. या लढ्यात नयना पाटील या मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये ३०० पेक्षा जास्त कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये राहून त्यांना औषधी देण्याचे कर्तव्य निडरपणे पार पाडत आहेत. श्रीमती पाटील या नायर हॉस्पिटलमध्ये फार्मसिस्ट म्हणून गेल्या चार वर्षांपासून नोकरी करीत आहेत. देशात कोरोनाचा प्रभाव वाढल्यापासून म्हणजेच १ एप्रिल पासून त्यांची ड्युटी नायर हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्ड मध्ये लागली आहे. या हॉस्पिटलची रुग्ण क्षमता आता १६०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. पण सध्या या हॉस्पिटलमध्ये ३०० पेक्षा जास्त कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांचे स्वॅब अहवाल तपासणी करणे, सर्व रुग्णांना त्यांच्या वॉर्डमध्ये औषधी नेऊन देणे ही ड्युटी श्रीमती पाटील पार पाडत आहेत. त्या रेंभोटा येथील (कै.) प्रकाश बंडू पाटील यांच्या सुनबाई आहेत. त्यांचे पती उमेश पाटील हे दक्षिण आफ्रिकेतील केनिया येथे नोकरी करीत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलाला आई-वडिलांजवळ साकेगांव येथे माहेरीच ठेवले आहे. 

 
टाटांचा उदात्त दृष्टिकोन 
कोरोना रूग्णांसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी टाटांनी त्यांचे ताज हॉटेल उपलब्ध करून दिले आहे. श्रीमती पाटील नायर रुग्णालयातून बसने ताज हॉटेलमध्ये जातात. सर्वांचीच भोजन आणि निवासाची उत्तम सोय या हॉटेलमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वोत्तम हॉटेल आरोग्य विभागाच्या सर्वांसाठी उपलब्ध करून देणे ही टाटांच्या उदात्त दृष्टीकोनाची आणि मोठ्या मनाची साक्षच असल्याचे त्यांनी सांगितले. 

देश सेवेची संधी 
आजूबाजूला सर्वत्र कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट असताना आणि आणि मोठ्या संख्येने रुग्ण दगावत असताना सुरुवातीला भीती वाटत होती. पण आता मनाची तयारी झाली आहे. देशसेवा करण्याची ही उत्तम संधी उपलब्ध झाल्याची भावना आता मनात आहे. आम्ही सारेच जण स्वतःची काळजी घेतच आहोत. पण पॉझिटिव्ह रुग्ण सुधारण्याचे प्रमाणही वाढत चालल्याने आता भीती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. लवकरच कोरोनाचा संसर्ग देशातून संपुष्टात येवो आणि देश कोरोनामुक्त होवो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT