wine shop fire 
उत्तर महाराष्ट्र

महिलांनी पेटविले दारूचे तीन दुकाने 

सकाळ वृत्तसेवा

रावेर : वाघोड (ता. रावेर) येथे अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात संतप्त महिलांनी आज (ता 23) रुद्रावतार धारण करत दारू विक्रेत्यांचे तीन दुकाने पेटविले. 
वाघोड गावात दारूबंदी असताना सर्रासपणे विक्री होत होती. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही दारूबंदी होत नव्हती. आज रात्री महिलांनी एकत्र येत रुद्रावतार धारण केला. गावातील बसस्थानक भागातील एक आणि अन्य एक अशा अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांच्या तीन टपऱ्या जाळून टाकल्या. सुरवातीला 20-25 महिलांनी ही आक्रमक भूमिका घेतली. ही बातमी गावात कळताच उत्स्फूर्तपणे आणखी शंभर सव्वाशे महिला त्यात सहभागी झाल्या आणि त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. 
दारूमुळे गावातील अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत होते. असे असताना दारू विक्रेत्यांचा धंदा जोमाने सुरू होता. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी डोळेझाक केल्याने महिलांचा संताप अनावर झाला होता. अवैध धंदेवाल्यांवर कारवाईची मागणी होत असताना पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येत होते. आज (ता 23) रात्री महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील तीन टपऱ्या जाळून टाकल्या. दरम्यान रावेर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील कदम व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिलांनी त्यांना जाब विचारत दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. 

पाच वर्षापूर्वी आडवी बाटली 
वाघोड गावातील महिलांनी दारूबंदी विरोधात यापूर्वीही एल्गार केला होता. त्यावेळी मतदान होऊन दारूचे दुकान बंद करण्याबाबत महिलांनी कौल दिल्याने गावातील देशीदारूचे दुकान बंद करण्यात आले होते. मात्र अवैध दारू विक्रेत्यांनी दुकाने पुन्हा थाटल्याने पूर्वी सारखाच त्रास महिलांना व ग्रामस्थांना होऊ लागला होता. दारू पिणाऱ्यांची आरडाओरड, भांडण तंटे, घरात पैसे न देणे, महिलांना मारहाण होत होते. गावात दारूबंदी होऊनही फायदा होत नाही यामुळे महिलांच्या संयमाचा बांध सुटला व त्यांनी दुकाने पेटवून देत रूद्रावताराचे दर्शन घडविले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

SCROLL FOR NEXT