उत्तर महाराष्ट्र

पळा...पळा खड्यात पडला; दोन महिन्यांत ३० अपघात !

रमेश पाटील

सारंगखेडा : पळा... पळा... खड्ड्यांत मोटारस्वार पडला. हे उच्चार आता नित्याचे झाले आहेत. शहादा ते सारंगखेडा रस्त्यावरील मॉँ सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळील खड्यामुळे दुचाकीस्वारांचा वारंवार अपघात होत असून, बुधवारी (ता. २६) खड्ड्यांमध्ये आदळून दुचाकीस्वार जखमी झाले. यापूर्वी येथे रोज अपघात होत असल्याने येथून प्रवास करणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ झाला आहे. दोन महिन्यांत खड्ड्यांमुळे ३० अपघात झाले आहेत. संबंधित बांधकाम विभाग दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.   


शहाद्याकडून सारंगखेड्याकडे येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकींचे वारंवार अपघात होत आहेत. खड्ड्यांमध्ये आदळून दुचाकीस्वार जखमी होत आहेत. अन्य वाहनांचेही नुकसान होत आहे. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. रोजच हा त्रास सहन करावा लागत असून, प्रवास करणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या ठिकाणी खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. 

दुचाकीस्वार जखमी 
बुधवारी सकाळी रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने अपघात झाला. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली. संबंधित अपघातग्रस्ताला माँ सप्तश्रृंगी पेट्रोलपंपांवरील कर्मचाऱ्यांनी उचलून रुग्णालयात पोचविले. खड्ड्यांमुळे होत असलेल्या रोजच्या अपघातांमुळे पोलिसही वैतागले आहेत. सारंगखेडा परिसरातील लहान- मोठ्या गावांची बाजारपेठ आहे व परिसरात अनेक गावांमध्ये बससेवा बंद असल्याने सर्वाधिक दुचाकींचा वापर होतो. सारंगखेडा पोलिस ठाण्यातील निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

SCROLL FOR NEXT