mseb 
उत्तर महाराष्ट्र

लॉकडाउन काळातही अखंड वीजपुरवठा

प्रवीण पाटील

सावदा : राज्यात लॉकडाउनमुळे सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, या काळात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची काळजी घेतली जात आहे. लॉकडाउन काळातही रावेर, यावल या तालुक्यांतील गावांमध्ये, घराघरांत व शेतशिवारात वीजपुरवठा अखंडपणे सुरू आहे. याचे श्रेय ‘महावितरण’चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजनाला जाते. 

लॉकडाउन असल्याने वीजग्राहकांची तक्रार दूरध्वनीवरून जरी आली, तरी तिची दखल घेऊन दुरुस्तीचे काम ‘महावितरण’तर्फे तातडीने केले जात आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत आहेत. शासनाने दिलेल्या आदेशाचे कर्मचारी तंतोतंत पालन करीत आहेत. वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी शहर व ग्रामीण भागावर ‘महावितरण’ची सर्व टीम बारकाईने लक्ष ठेवत आहे. लॉकडाउन काळात लोक घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून ते मनोरंजनासाठी ‘टीव्ही‘समोर बसून असतात. यासाठी वीजपुरवठा महत्त्वाचा आहे. 

सावदा उपविभागीय कार्यालयांतर्गत तालुक्यातील एकूण ४३ गावे आहेत. एकूण १२ कक्ष कार्यालये, ६ उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. दूरध्वनीवरून प्राप्त तक्रारीनुसार अखंडित वीजपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरणा करावे. 
- सुहास चौधरी, उपविभागीय अभियंता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT