उत्तर महाराष्ट्र

कुपोषण संपता संपेना...शहादा तालुक्यात ८२८ कुपोषित बालके   

कमलेश पटेल

शहादा : कुपोषण मुक्तीकरिता सरकारकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहेत. विविध पोषण आहाराच्या योजनाही राबविल्या जात आहेत. त्यानंतरही कुपोषणमुक्ती होत नसल्याचे वास्तव आहे. बाल विकास प्रकल्प विभागाचा जून महिन्याचा अहवालानुसार एकट्या शहादा तालुक्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील तीव्र (सॅम) जोखमीचे ८२८ तर मध्यम (मॅम) ४ हजार २९८ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. 

शहादा तालुक्यात महिला व बालकल्याण विभागाचे शहादा व म्हसावद हे दोन प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प मिळून ४१ हजार ८५० बालके अंगणवाडीत शिक्षण घेत आहेत. त्यात शहादा प्रकल्पात १६ हजार ४८ बालके, तर म्हसावद प्रकल्पात २५ हजार ७६६ बालकांची नोंद आहे. शहादा तालुका हा सधन व सपाटीवर आहे. तरी कुपोषण हद्दपार होण्याचे नाव घेत नाही. कुपोषणमुक्तीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध प्रयोग राबविले जात आहेत. आरोग्य यंत्रणेसह अंगणवाड्यांतून कुपोषित बालके व त्यांच्या मातांचे संगोपन करण्याचा प्रयत्नही होत आहे. अंगणवाड्यांतून पोषण आहार पुरविला जातो. आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून अंगणवाडी केंद्रात जाऊन कुपोषित बालकांची तपासणी केली जाते. कुपोषित बालकांच्या शुश्रूषेकरिता व्हीसीडीसी केंद्र आहे. या बाल उपचार केंद्रात सौम्य व मध्यम गटातील कुपोषित बालके व मातांची तपासणी करीत पोषण आहार दिला जातो. 


तीव्र गटातील बालकांकरिता जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात कुपोषित बालक व मातांना भरती करून घेतले जाते. यात भरती केलेल्या दिवसांची बुडीत मजुरी मातेला मिळते. शिवाय बालक व मातेची दररोज तपासणी होते. त्यांना पोषण आहार दिला जातो. तज्ज्ञांकडून बालकाचे दररोज वजन व उंची मोजली जाते. १४ दिवसांत बालकाचे वजन १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्यानंतर त्यांना सुट्टी दिली जाते. दरम्यान लॉकडाउनच्या काळात आहारात खंड पडू नये, यासाठी घरपोच आहार देण्यात आला. तरीही कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नाही. 

कुपोषण दृष्टिक्षेपात (शहादा तालुका) 
प्रकल्प - प्रविष्ट बालके- सॅम - मॅम 
शहादा प्रकल्प १६,०४८ - २६८ - १४७१ 
म्हसावद प्रकल्प २५,७६६ - ५६० - २८२७ 
एकूण ४१,८५०- ८२८ - ४२९८ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT