उत्तर महाराष्ट्र

कोरोनाचा कहरः शहाद्याचीही रेडझोनकडे वाटचाल सुरू 

दिनानाथ पाटील

शहादा  : तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, रुग्णांची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. शहादा तालुका आता हॉटस्पॉट होऊ पाहत आहे. प्रशासनाची उपाययोजना व नागरिकांचे सहकार्य असतानाही संपर्क साखळी तुटत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्याची सीमा सील असतानाही आढळून येणाऱ्या रुग्णांचे कोरोना कनेक्शन अन्य हॉटस्पॉट शहरांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


एप्रिलच्या मध्यावर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाली. त्यात एकाचे निधन झाले, तर बाकीचे उपचारांती बरे होऊन घरी परतले. तालुक्याच्या सीमेलगत असलेले धुळे, शिरपूर, नाशिक, सुरत, अंकलेश्वर (गुजरात) ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने हळूहळू शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरवले. तीन महिन्यांत कोरोनाचे ७९ रुग्ण आढळून आले. उपचारांती बरे होणाऱ्यांचा रेशो ५० टक्के असला तरी महिन्याला २५ रुग्ण हा आकडा मनात धडकी भरविणारा आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तालुक्याची सीमा सील केली. तसेच गेल्या आठवड्यात चार दिवस लॉकडाउन करण्यात आले होते. कोरोनाची साखळी तुटत नसल्याने जिल्हा प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. सद्यःस्थितीत शहरात चोवीस व ग्रामीण भागातील चार मिळून तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ आहे. यातील अपवाद वगळता त्याच्यातील व नुकतेच निधन झालेल्या दोघांचे कनेक्शन धुळे, शिरपूर, नाशिक, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आदी शहरांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर सर्वांची तपासणी होते. अधिकृत पासशिवाय परवानगी नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव का व कसा वाढतोय, याचा शोध घेणे आवश्यक आहे. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांना आरोग्य तपासणीसह सक्तीने क्वारंटाइन करणे आवश्यक आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक भीतीपोटी घरगुती उपचार घेत असल्याची चर्चा आहे. त्यातून कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने घरोघरी सक्तीची आरोग्य तपासणी सुरू करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता, येत्या काही दिवसांत शहादा शंभरी पार करीत नंदुरबारला मागे टाकण्याची भीती व्यक्त होत आहे. 

एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ः ७९ 
उपचार घेत असलेले ः ३१ 
जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेले ः 3 
निधन झालेले रुग्ण ः ८ 
बरे झालेले रुग्ण ः ३७  

 संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Success Story: ज्या मित्रासोबत अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं, तोच मुलाखतीपूर्वी सोडून गेला; दुःखावर मात करत शुभम बनला IPS!

Marriage Fraud : विवाह होऊन घरी जाताच ‘नवरी’ पहाटेच पसार ,तरुणाची पाच लाखांची फसवणूक; मध्यस्थाला अटक

'अशा स्टेप्स करण्याची काय गरज?' अवनीत कौरच्या डान्सवर नेटकरी भडकले! सोशल मीडियावर संताप

IND vs NZ 2nd Test Live: ध्रुव जुरेलची झुंझार खेळी, जसप्रीत बुमराहला गवसला सूर; तरीही न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवशी काय काय घडलं?

Iran Starlink US Military : इराणने अमेरिकन लष्कराविरोधात केला स्टारलिंकचा वापर? गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT