home guard 
उत्तर महाराष्ट्र

मृत व्यक्‍ती आले बंदोबस्‍ताला...कसे ते वाचा...

दिनानाथ पाटील

शहादा : व्यक्‍ती मृत झाली तरी देखील ती कोरोनाच्या काळात बंदोबस्‍ताला आली. इतकेच नाही तर निलंबित केलेल्‍यांना देखील बंदोबस्‍ताला बोलाविण्यात आले. हे प्रत्‍यक्ष बंदोबस्‍ताला रस्‍त्‍यावर नव्हते; तर कागदोपत्री दाखविण्याचा धक्‍कादायक प्रकार शहादा येथे उघडकीस आला आहे.

कोरोना काळात बंदोबस्तासाठी शहादा तालूक्यात होमगार्डची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा होमगार्ड विभागाकडून मंजूर झालेल्या यादीतील व्यक्तींना सलग ड्युटी न देता क्रमाक्रमाने देण्यात येते. एक दिवसाकरीता ६७० रूपयांप्रमाणे मेहनताना देण्यात येतो. त्यामुळे ड्युटी मिळावी, यासाठी फिल्डींगही लावण्याचे प्रकार घडत असल्याची व यादीत नाव असताना ड्युटी न मिळालेलेही असल्याची चर्चा आहे. 

असे सापडले नाव
एक महिन्यापूर्वी निधन झालेले हाफिज उर्फ आसिफ शेख हनीफ कासार (यादीतील ३४ नंबर) यांना मरणोपरांत बंदोबस्ताची ड्युटीसाठी यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एप्रिलमध्ये निलंबित करण्यात आलेले होमगार्ड राजेंद्र लक्ष्मण देसले (म्हसावद यादीतील क्रमांक १०) यांचे नावही बंदोस्त ड्युटीत आहे. हा प्रकार संशय कल्लोळ निर्माण करणारा असल्याची चर्चा शहाद्यात सुरू आहे. 

वयाची अट 
एकीकडे होमगार्ड ४५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याचे कारण सांगून बंदोबस्त नाकारला जातो. मात्र दुसरीकडे यादीत ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यांची देखील नावे आहेत. विभागाच्या या अंधाधुंद कारभारावर कोणाचाही वचक नसल्याचे स्पष्ट होते. विभागाच्या या अजब कारभाराची नागरिकात चर्चा होत असून या घटनेचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Success Story: ज्या मित्रासोबत अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं, तोच मुलाखतीपूर्वी सोडून गेला; दुःखावर मात करत शुभम बनला IPS!

Marriage Fraud : विवाह होऊन घरी जाताच ‘नवरी’ पहाटेच पसार ,तरुणाची पाच लाखांची फसवणूक; मध्यस्थाला अटक

'अशा स्टेप्स करण्याची काय गरज?' अवनीत कौरच्या डान्सवर नेटकरी भडकले! सोशल मीडियावर संताप

IND vs NZ 2nd Test Live: ध्रुव जुरेलची झुंझार खेळी, जसप्रीत बुमराहला गवसला सूर; तरीही न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, तिसऱ्या दिवशी काय काय घडलं?

Iran Starlink US Military : इराणने अमेरिकन लष्कराविरोधात केला स्टारलिंकचा वापर? गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT