उत्तर महाराष्ट्र

शासकीय यंत्रणेला दानशूरांच्या मदतीचे हात ! 

सकाळवृत्तसेवा

शहादा  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल व पालिका प्रशासनासह वैद्यकीय यंत्रणेद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेकांचा हातभार लागत आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था- संघटनांसह काहींनी व्यक्तिगत स्तरावर नागरिकांना मास्क दिले. काहींनी सॅनिटायझर, तर काहींकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. एकूणच थैमान घातलेल्या या विषाणूपासून सर्वसामान्यांचा बचाव व्हावा यासाठी गरीब- दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. 

सर्वत्र गर्दीचे निर्बंध लागू असले, तरी सर्वसामान्य जनतेला शिस्त लावताना पोलिसांची मात्र दमछाक होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था सर्वसामान्य नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करीत आहेत. त्यातून गरिबांना आजाराविषयीचे संरक्षण किट मिळत आहे. हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, फाउंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. 

गंगोत्री फाउंडेशनचा पुढाकार 
गंगोत्री फाउंडेशन व तालुका एज्युकेशन संस्थेतील कर्मचारी यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे पाच हजार किटचे शहरासह तालुक्यातील गरीब कुटुंबीयांना जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अभिजित पाटील यांच्या हस्ते तसेच घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अभिजित पाटील, प्रीती पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT