उत्तर महाराष्ट्र

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मुलाने साकारले ‘आॕक्सिजन पार्क’  ​

प्रा. डी. सी. पाटील

शहादा: जन्माला आलो आहोत तर निसर्गासोबत वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करावा. या हेतूने निझर या मूळ गावाचे व सध्या सोनगड (जि. तापी) येथे स्थायिक असलेले राकेश पटेल यांनी वडील ओंकार पटेल व भगिनी मालवीबेन यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. त्याच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाला मित्रांची साथ लाभल्याने हा पार्क पूर्णत्वास आला आहे. 

सोनगडच्या देसरा कॉलनी परिसरातील गणेश मंदिर परिसर आणि त्या शेजारच्या डोंगरावर राकेश पटेल कुटुंबाने सुमारे ३०० झाडांची रोपे लावून अनोख्या पद्धतीने वडील व भगिनीचा वाढदिवस साजरा केला. पर्यावरण जनजागृतीसाठी राकेशभाईंनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गत दोन वर्षांत सहाशेहून अधिक झाडे लावल्यानंतर मंदिरालगत असलेल्या टेकडीला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. सोनगडच्या या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून जंगल तयार करण्यासह तसेच सूर्योदय व सूर्यास्ताच्या नैसर्गिक देखाव्याचा आनंद घेण्याच्या दृष्टीने राकेशभाई प्रयत्न करीत आहेत. सोबत पालिकेनेही मदतीचा हात देत व्यायामाची उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

 
हा पार्क नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या नैसर्गिक टेकडीला (ऑक्सिजन पार्क) भेट देण्यासाठी पर्यावरण प्रेमी व नागरिक गर्दी करतात. राकेशभाईंनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत दोन वर्षात पूर्णत्वास नेला आहे. पर्यावरण जनजागृती करण्यापेक्षा प्रत्यक्ष साकारण्याची किमया करणारे पटेल व त्यांना मदतीचा हात देणाऱ्या मित्र परिवाराचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT