live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

शहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला 

सकाळवृत्तसेवा

शहादा ः जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध केला जात असून, शहादा येथे पुतळा दहन करतेवेळी पेट्रोलचा भडका होऊन एका तरुणाचा चेहरा गंभीररित्या भाजल्याची घटना घडली. 

शहादात शहरात रविवारी (ता.17) सायंकाळी सातच्या सुमारास दहशवादाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना एक तरुण भाजला. राजू इलियास मेमन (वय 43) असे जखमी तरुणाचे नाव आहे. राजी यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. शहादा शहरातील मेमन कॉलनीत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून मुस्लिम बांधव पुलवाना हल्ल्याचा निषेध करत होते. पुतळा दहन करताना राजूच्या हातात पेट्रोलची बाटली होती. पुतळ्याला आग लावताच हातात असलेल्या पेट्रोलच्या बाटलीने पेट घेतल्याबरोबर राजीच्या दाढीच्या केसांनी देखील पेट घेतला. त्यात राजू यांचा चेहराही भाजला गेला. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज दुपारी उचाराअंती त्यांना घरी सोडण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान आंदोलन करताना काळजी घेण्याची सूचना पोलीस प्रशासनसह नागरिकांना केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT