fire
fire 
उत्तर महाराष्ट्र

अडीच लाखाच्या भाताच्या पेंढ्या आगीत खाक

सकाळ वृत्तसेवा

शहादा : शहरातील प्रकाशा रस्त्यावर असलेल्या नंदनवन हॉटेल मागील मोकळ्या जागेत एका पपई व्यापार्‍याच्या पपईचा वाहतुकीवेळी संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या कोरड्या भाताचा पेंढीचा ढिगाला आज दुपारी सव्वाच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात सुमारे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.परिसरातील नागरिक व पालिकेचे अग्निशमन बंब वेळीच दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.दरम्यान भाताची ही पेंढी कोरडी असल्याने सूर्याचा प्रखर उष्णतेने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केलेली आहे.यासाठी अनेक पपई खरेदीदार व्यापारी शहरात दाखल झाले आहेत. येथूनच सर्व सूत्र हलवतात. शहरातील रफिक कासम बागवान हे पपईची खरेदी विक्री करत असतात. शहरातील प्रकाशा रस्त्यावर असलेल्या नंदनवन हॉटेल मागे असलेल्या मोकळ्या जागेत बागवान यांचा भाताचा पेंडीचा (चारा)ढीग होता. आज दुपारी सव्वाच्या सुमारास सूर्याच्या प्रखर उष्णतेने कोरड्या चाऱ्याला आग लागली त्यात सुमारे १६० गाठींचे नुकसान झाले. एक गाठ सुमारे अकराशे रुपये खर्चून राजकोट (गुजरात)येथून मागवली जाते. बागवान यांनी सुमारे दोन गाडी म्हणजेच १६० गाठी मागवून मोकळ्या जागेत ठेवल्या होत्या.पपईचा तोडणीनंतर गाडीत वाहतुकीसाठी कोरड्या भाताचा पेंडीचा वापर केला जातो.त्यामुळे पपई खराब होत नाही व पिकण्यास मदत होते .या उद्देशाने त्याचा वापर करतात. आज दुपारी लागलेली आग सर्वप्रथम शेजारी राहणारे पत्रकार सल्लाउद्दीन लोहार यांच्या निदर्शनास आली .त्यांनी लगेच परिसरातील नागरिकांना सांगितली व जमालुद्दिन लोहार, रफिक बागवान यांनी लागलीच आपल्या बोरवेल्स सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच शहादा पालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. 

मोठा अनर्थ टळला..... 
दरम्यान, परिसरात मोटार गॅरेज असल्याने अनेक वाहने दुरुस्तीसाठी येतात. त्यामुळे याच मोकळ्या जागेत वाहनांच्या रांगा लागतात.परंतु सध्या लॉक डाऊन असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT