उत्तर महाराष्ट्र

शहादेकरांवर असेल चार ड्रोनची नजर..विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर वचक 

सकाळवृत्तसेवा

शहादा  : लॉकडाऊन कालावधीत नियम तोडून विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेराने नजर ठेवणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली. 

देशात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. शासनाने लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला आहे. संचारबंदी दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीला आता ड्रोन कॅमेरा घेण्यात आला आहे. त्यामुळे वायफळ फिरणाऱ्यांवर अंकुश बसणार आहे. काही नागरिक लॉकडाऊनचे गांभीर्य न घेता बरेच युवक रस्त्यांवर विनाकारण हिंडत असतात. दुचाकी फिरवत असतात, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी ही गर्दी करतात. हा सारा प्रकार बघता पोलिस प्रशासनातर्फे संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेराने निगराणी केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली. 

चार कॅमेरे असणार 
पुण्याच्या धर्तीवर शहादा शहरातही ड्रोनच्या कॅमेराने छायाचित्रे घेतली जातील. नंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण चार ड्रोन कॅमेरे मागविण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याबाबत कारवाई देखील सुरू केली आहे. प्रत्येक शहादेकराने पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. ड्रोनच्या माध्यमातून कडक पावले उचलली गेली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT