live 
उत्तर महाराष्ट्र

अज्ञात रोगामुळे 32 मेंढ्या मृत्युमुखी,50 पेक्षा अधिकांना रोगाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

देवळा: खालप (ता. देवळा) शिवारात अज्ञात रोगामुळे सुमारे 32 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून, 50 पेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण असून, रोगाची लागण इतर मेंढ्यांना व कळपाला होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. 
ठेंगोडा (ता. बागलाण) येथील संजय झाडे व अभिमन झाडे यांच्या मालकीच्या 150 मेंढ्या असून, देवळा तालुक्‍यात खालप शिवारात त्यांचे वाडे बसत आहेत. दोन दिवसांपासून अज्ञात रोगामुळे मेंढ्या मृत्युमुखी पडत आहेत. आतापर्यंत 32 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून, इतर 50 पेक्षा अधिक रोगाने ग्रस्त आहेत. पशुवैद्यकांनी तपासणी करून मेंढ्यांवर उपचार केले, पण रोगाचे निदान होत नाही. यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे पशुवैद्यक भाऊसाहेब वानले यांनी सांगितले. 
सध्या दुष्काळी स्थिती असून, अद्याप मोठा पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची वानवाच आहे. त्यात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने झाडे कुटुंबीय निराशेच्या गर्तेत सापडले आहे. मृत मेंढ्यांचा तातडीने पंचनामा करून मेंढपाळांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी धनगर समाजबांधव व शेतकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran cyber attack: इराणचा डिजिटल हल्ला? समुद्राखालील केबल्स धोक्यात, भारतातील इंटरनेट-बँकिंग विस्कळीत होण्याची भीती

Sambhajinagar News: कन्नडमध्ये ‘हायटेक’ स्वच्छतेची सुरुवात; ८ हजार मालमत्तांचे जिओ टॅगिंग

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीमुळे नुकसान, शेतमाल मातीमोल, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Beed News: बीडमध्ये गर्भवती महिलेला मारहाण; ‘तिहेरी तलाक’ देत हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT