उत्तर महाराष्ट्र

इंग्रजांपेक्षाही केंद्रातील भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी- मंत्री पाडवी

जितेंद्र मेखे

शिंदखेडा ः इंग्रजांपेक्षाही शेतकऱ्यांविरुद्ध काळे कायदे करणारे केंद्रातील भाजप सरकार आहे. शेतकरी विरोधी व शेतकऱ्यांचे हित न साधणारे हे सरकार असल्याची टिका आदिवासी कल्याण मंत्री के. सी. पाडवी यांनी केले. 

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी धोरण विरोधात शिंदखेडा तालुका कॉंग्रेयाच्या वतीने भव्य ट्रॅकटर रॅलीचेआयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खाजदर बापू चौरे, माजी आमदार डी एस आहिरे, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा इंटक कॉंग्रेस चे प्रमोद सिसोदे, शिंदखेडा काँग्रेसचे गटनेते दीपक देसले, नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक आहिरे, चंद्रकांत सोनावणे, 
हेमराज पाटील ,अलोक रघुवंशी, दरबरसिंग गिरासे आदी उपस्थित होते 

शेतकरी, कामगार, छोटे उद्योग पती यांच्या विरोधातील भाजप सरकार असून मोठया उद्योग पतींचे हे सरकार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण खानदेशात काँगेसचे ताकद वाढेल व सर्व खाजदर काँग्रेसचे राहतील असा विश्वास मंत्री पाडवी यांनी व्यक्त केला शिंदखेडा तालुक्यात शाम सनेर यांना न्याय दिला जाईल असेही ते म्हणाले. 


केंद्र सरकार हे अदाणी आणि अंबाणीचे आहे 80 टक्के शेतकरी ग्रामीण भागाचा आहे. त्यांच्या विरोधात केंद्र सरकार विधायक आणत असून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. 
सी सी आय कापूस केंद्राचे श्रेय आमदार रावल विनाकारण घेत आहेत असे शाम सनेर यांनी सांगितले शिंदखेड्या साठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती हवी अशी मागणी त्यांनी केली सर्व सत्ता केंद्र रावल दोंडाईचा येथे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रॅक्टर रॅलीला चांगला प्रतिसाद 

येथील एस एस व्ही पी एस कॉलेज येथील रॅलीस सुरवात झाली केंद्र सरकार विरोधाचे प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली स्टेशन रोड, शिवाजी चौक, गांधी चौक, माळीवाडा, भगवा चौक व बीजसनी मंगल कार्यालय येथे रॅलीचे सांगता करण्यात आली साधारण दोन किलोमीटर व जवळ जवळ तीनशे ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होते.

संपादन- भूषण श्रीखंडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT