उत्तर महाराष्ट्र

एकाचा मृतदेह बाहेर काढत नाही तोच दुसऱ्याने घेतली नदीत उडी आणि खळबळ माजली

सचिन पाटील

शिरपूर : नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढत असतानाच पुलावरून वृद्धाने नदीत उडी टाकल्याची घटना सावळदे (ता. शिरपूर) येथे घडली. उशिरापर्यंत शोध घेऊनही वृद्धाचा शोध लागू शकला नाही. 

वाचा- बंद घरात गुटख्याचे घबाड, पोलिसांनी टाकला रात्री छापा आणि सापडला पाच लाखा माल

येथील करवंद नाका परिसरातील रहिवासी तथा सावता हॉटेलचे संचालक प्रवीण भगवान माळी (वय ४३) बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. दुपारी तापी नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे नातलग सावळदे येथे पोचले. तेथे पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. तासभर परिश्रम घेतल्यानंतर प्रवीण माळी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. शरद भाऊराव पाटील याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. 

वृद्धाची उडी 
माळी यांचा मृतदेह बाहेर काढत असतानाच सावळदे येथील पुलावरून वृद्धाने नदीपात्रात उडी टाकली. या प्रकाराने एकच खळबळ माजली. उडी टाकण्यापूर्वी संबंधिताने खिशातील पाकीट पुलावर टाकले. त्यातील कागदपत्रांवरून उडी टाकणाऱ्याचे नाव विश्वास त्र्यंबक पाटील (वय ६१) असून, ते वलवाडी (धुळे) येथील यशोधन कॉलनीतील प्लॉट क्रमांक ५३ मधील रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाकिटात त्यांचे छायाचित्रही आढळले. लागलीच नदीपात्रात उडी टाकलेल्या जागी शोध सुरू झाला. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. अंधारामुळे शोधकार्य थांबविणे भाग पडले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT