forest areay tree cut forest areay tree cut
उत्तर महाराष्ट्र

वनजमिनीवर अतिक्रमणासाठी लंगडी वनक्षेत्रात शेकडो झाडांची कत्तल

Dhule Forest News : शेकडो झाडांची कत्तल झाल्याचे लंगडी येथील आदिवासी बांधवांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व नागपूर येथील मुख्य कार्यालयात कळविले.

सकाळ डिजिटल टीम


मंदाणे : शहादा तालुक्याच्या पूर्वेकडील लंगडी, घोटाळी, शहाणे परिसरातील वनक्षेत्रात ( Shahane Forest areay)जमावाकडून तीन-चार दिवसांपासून शेकडो झाडांची कत्तल ( Tree broke) करून अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले असून, वन विभाग (forest department) मात्र अपूर्ण कर्मचारी असल्याचे निमित्त पुढे करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

(langdi forest areay tree many trees were cut down neglected by forest department)

शहादा तालुक्यातील मंदाणे, शहाणे व जयनगरच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक वर्षांपासून वृक्षांची खुलेआम कत्तल करून अतिक्रमित वनजमिनीवर ताबा करून शेती कसण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.
तीन-चार दिवसांपासून लंगडी व शहाणे घोटाळीच्या जंगलात ३०० ते ४०० अज्ञात लोकांकडून अवैध वृक्षतोड बिनदिक्कतपणे सुरू आहे. याबाबत लंगडी येथील आदिवासी बांधवांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व नागपूर येथील मुख्य कार्यालयात कळविल्यानंतर आणि निद्रिस्त असलेला वन विभाग जागा झाला. वृक्षतोडीसाठी मोठा जमाव असल्याने स्थानिक वनरक्षक व कर्मचारी अक्षरशः हतबल झाले आहेत. वृक्षतोड करणाऱ्या जमावाकडे कुऱ्हाडी, धाऱ्या, तिरकामठे अशी धारदार शस्त्र असल्याने त्यांना अडविणे म्हणजे जिवानिशी जाणे, अशी भीती वनकर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी व अतिक्रमण होण्यास प्रतिबंध करून वनराई वाचवावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. वन विभागाकडून या भागात वृक्षलागवडीसाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, एवढा खर्च करूनही किती झाडे जगली हा एक संशोधनाचा भाग आहे, तसेच या भागातील वर्षानुवर्षे चाललेल्या वृक्षतोडीस रोखण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.



वनकर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी जंगल वाऱ्यावर
मंदाणे, जयनगर व शहाणे येथे स्वतंत्र वनपाल व चार-पाच वनरक्षक असे एकूण १५ ते २० कर्मचारी नेमणुकीला आहेत. त्यांपैकी एक, दोन कर्मचारी वगळता वनपालासह अन्य कर्मचारी मुख्यालयात न राहता शहाद्यात राहतात. शहाणे येथे वनकर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने लाखो रुपये खर्च करून बांधली आहेत. मात्र, तेथील वनपाल मुख्यालयात वास्तव्याला नाहीत. वनक्षेत्रपालांसह वनपालांकडे इतरही भागाचा कारभार असल्याने जंगलाला कोणी वालीच राहिलेला नाही. वृक्षतोड करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याने दिवसेंदिवस जंगल नष्ट होत आहे.



वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
अवैध झाडांची कत्तल सुरू असल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली व लंगडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. वृक्षतोड झालेल्या ठिकाणी नव्याने वृक्षलागवड केली जाईल व झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. वन विभागातील कर्मचाऱ्यांचा सतत पहारा व गस्त घालण्यात येईल, असे आश्वासन उपवनसंरक्षक के. बी. भवर यांनी दिले. या वेळी सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल रत्नपारखी, वनक्षेत्रपाल एस. एस. खुणे, जयनगर वनपाल डी. बी. जगदाळे, एस. एस. इंदवे, भरतसिंह राजपूत, डी. के. जाधव, पी. एस. पाटील, मंडलिक व वनकर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT