dhule 
उत्तर महाराष्ट्र

मालकातरच्या "मालामाल' रेशन दुकानदारावर गुन्हा

सकाळवृत्तसेवा

धुळे, ता.ः जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मालकातर (ता. शिरपूर) येथील स्वस्त धान्य दुकानात वितरित केलेल्या धान्यापेक्षा जादा धान्यसाठा आढळून आला. तो काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने रेशन दुकानदारासह तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. 
मालकातर गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. तेथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाबाबत अनियमितता असल्याच्या तक्रारी होत्या. काल (ता.10) जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, विवेक घुगे व शिरपूरच्या पुरवठा निरीक्षक अपर्णा वडुरकर यांच्या पथकाने धाड टाकली. 

जादा धान्यसाठा आढळला 
शिरपूरच्या शासकीय गुदामातून एकूण 72.50 क्विंटल गहू दिलेला असताना प्रत्यक्षात 13.50 क्विंटल गहू जादा आढळून आला; तसेच शासकीय गोदामातून कोणत्याही योजनेंतर्गत तांदूळ दिलेला नसताना 19.00 क्विंटल तांदूळ आढळून आला. हे जादा धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ज्या घरांत धान्यसाठा होता त्या संबंधित दोन्ही घर मालकांकडे धान्य साठवणुकीबाबत कोणत्याही सक्षम प्राधिकारीची परवानगी नव्हती. स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा यांना वारंवार दूरध्वनी करूनही ते उपस्थित राहिले नाही. तसेच साठा व विक्री नोंदवहीदेखील उपलब्ध केली नाही. लाभार्थ्यांचा 35 किलोऐवजी 10 किलो धान्य दिल्याचा जबाबही होता. याप्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भामरे यांच्या फिर्यादीवरून स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पावरा व बेकायदेशीररीत्या स्वतःच्या घरात रेशनचे धान्य साठवून ठेवल्याने पदम पाडका पावरा व रवींद्र विक्रम पावरा यांच्याविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT