उत्तर महाराष्ट्र

सिनेस्टाईल बंदूक हातात घेवून युवकाने काढला फोटो; याच फोटोमूळे झाला गजाआड !

सचिन पाटील

शिरपूर : हातात पिस्तूल घेऊन सिनेस्टाईल छायाचित्र काढण्याचा छंद युवकाला गजाआड घेऊन गेला. दुचाकी, मोबाईल, पिस्तूल आणि काडतुसे असा मुद्देमाल जप्त करून सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित आंतरराज्य स्तरावरील गुन्ह्यांत सहभागी असल्याची शक्यता तपासण्यात येत आहे. 

कर्नाटक-जोयदा कनेक्शन 
कर्नाटक राज्यात घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याचा मोबाईल तपासताना देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) हाती घेतलेल्या युवकाचे छायाचित्र आढळले. संशयिताने छायाचित्रातील युवकाचे नाव रोहित असून तो महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात राहत असल्याची माहिती दिली. कर्नाटक पोलिसांनी धुळे येथे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना त्याबाबत सूचित केले. श्री पंडित यांनी सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना कारवाईचे निर्देश दिले. 

रोहित निघाला अरुण 
अभिषेक पाटील यांनी संशयिताचा शोध घेतला. छायाचित्राआधारे ओळख पटवल्यावर संशयिताचे नाव अरुण रावजी पावरा (वय १९, रा. जोयदा ता. शिरपूर) असल्याचे निष्पन्न झाले. एक नोव्हेंबरला रात्री आठला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बजाज पल्सर दुचाकी (एमपी ४६ एमएल ७२७७) च्या सीटखाली देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली. या मुद्देमालाची एकूण किंमत ७२ हजार ४०० रुपये आहे. संशयिताच्या मोबाईलमध्येही त्याचे पिस्तूलासोबतचे छायाचित्र आढळले. त्याचे कर्नाटक कनेक्शन पोलिस तपासत आहेत. अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दीपक वारे, हवालदार लक्ष्मण गवळी, संजय जाधव, योगेश दाभाडे, योगेश मोरे, श्याम पावरा, गोविंद कोळी, रामदास बारेला यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

मोठी बातमी! ३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी; ‘एसआयटी’ला ३ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव; २,७९६ शिक्षकांची माहितीच मिळेना

Donald Trump Iran War Statement : युद्ध संपलंय... डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, मात्र इराणने दिले हे प्रत्युत्तर

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT