tapi river bridge 
उत्तर महाराष्ट्र

Breaking पुलावरून वाहन पडले, नेमके कोणते तपास लागेना

सचिन पाटील

शिरपूर : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे तापी नदीवरील पुलाचा कठडा तोडून अज्ञात वाहन नदीपात्रात कोसळले. हा अपघात सावळदे (ता. शिरपूर) गावाजवळ घडला. नदीला प्रशासनातर्फे तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आले. 

मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथे तापी नदीवर वाहतुकीसाठी दुपदरी पूल आहे. धुळ्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या पुलाच्या उजव्या बाजूच्या कठडा तुटल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. पुलावरून गाडी पडल्‍याचा अंदाज वर्तविला जात असून, कोणते वाहन नदीत पडले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अवजड वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून नदीपात्रात कोसळल्याचा अंदाज आहे. याबाबत ग्रामस्थांनी सूचित केल्यानंतर महसूल, पोलीस व महामार्ग विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. 

गाडीचा शोध सुरू
पुलाचा कठड्याचा मोठा भाग तुटल्‍याचे निदर्शनास आल्‍याने मोठे वाहन नदीत पडल्‍याचा अंदाज आहे. यामुळे मोठा कंटेनर किंवा लक्‍झरी पडल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. यापूर्वीही अशा स्वरूपाच्या चार घटना या पुलावर घडल्या असून त्यातील दोन वाहनांचा शोध लागू शकला नाही. 

संपादन : राजेश सोनवणे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

Kolhapur Politics: आमच्या खांद्यावरून सतेज पाटील गेले: हसन मुश्रीफ; ‘गोकुळ’च्या न्यायालयीन लढाईत त्यांचे योगदान नाही

SCROLL FOR NEXT