उत्तर महाराष्ट्र

परदेशातील भारतीयांप्रमाणे मजुरांसाठी तत्परता का नाही? : मेधा पाटकर  

सचिन पाटील


शिरपूरः परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ज्या तत्परतेने विमान- जहाजांची व्यवस्था करण्यात आली, तशी कार्यतत्परता सुमारे दोन हजार किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या लाखो मजुरांसाठी का दाखविली नाही. कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता जनावरांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबलेले मजूर देशाचे नागरिक नाहीत का, त्यांची व्यवस्था करण्यास उशीर का होतोय, असा प्रश्‍न उपस्थित करीत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच ठेवले. 

मुंबई- आग्रा महामार्गावरून पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आरोग्य, अन्न व वाहनांची सुविधा द्यावी, त्यांना इच्छित स्थळी सुरक्षेसह पोहोचवावे अशा मागण्यांसाठी मेधा पाटकर यांनी चार मेपासून ठिकरी (जि. बडवानी) येथे उपोषण सुरू केले. त्यांनी आज दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राज्यांच्या सीमा खुल्या केल्यानंतरही पायी प्रवास करणाऱ्या मजुरांचे प्रमाण आटोक्‍यात आलेले नाही. त्यांना वाहने व अन्य सुविधा देण्यात राज्य सरकारे अपयशी ठरली आहेत. "लॉक डाउन'चे परिणाम लक्षात घेता प्रचंड स्थलांतर घडणार हे अपेक्षित असताना त्यांच्या वाहतुकीसाठी शासनाने प्रयत्न का केले नाहीत, परदेशात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर विमाने, जहाजांची सोय केली, तशी मजुरांसाठी का नाही? मजूर भारतीय नागरिक नाहीत, अशीच शासनाची धारणा दिसते. त्यांची वैद्यकीय तपासणी न करताच वाहनांमध्ये कोंबून संसर्ग फैलावण्यास हातभार लावण्यात आला असा आरोप श्रीमती पाटकर यांनी केला. ही परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून, प्रमुख रस्त्यांवर या मजुरांवर लक्ष देण्याची परवानगी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मागणी श्रीमती पाटकर यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Fare Hike: इंधन संकटामुळे एअर इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अधिक परिणाम

Police Helmet Rule : पोलिस अधिकारी, अंमलदारांना ‘हेल्मेटसक्ती’; पोलिसांना हेल्मेट मोफत देण्याची सोय

Latest Marathi News Live Update : पुण्यात भयंकर प्रकार! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गामुळे माण-खटावमधील वन्यजीव अधिवास धोक्यात; मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या-लांडग्यांचा शिरकाव वाढणार?

दोन तासांचा प्रवास ३० मिनिटात, कॅशलेस तिकिट अन्...; नव्या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना फायदा, CM फडणवीस काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT