corona death corona death
उत्तर महाराष्ट्र

मुलीची बापासाठी..आर्त हाक; तरी नियतीने डाव साधलाच

उसनवार रक्कम घेऊन मुलीला मोबाईल घेऊन देत ऑनलाइन शिक्षणात खंड पडू दिला नाही.

एल. बी. चौधरी



सोनगीर ः ‘सर, माझे वडील आजारी आहेत. त्यांच्या उपचारासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. कृपया मला पाच हजार रुपये द्या. सुटीमध्ये शेतीकाम (Farming) करून मी पैसे फेडून देईन. माझ्या वडिलांशिवाय (Father) आम्हाला आधार नाही... ’नुकतीच नववी पास झालेली अत्यंत हुशार, पण गरीब विद्यार्थिनी मोहिनी गायकवाड एन. जी. बागूल हायस्कूलचे उपशिक्षक व्ही. आर. महाले यांना भ्रमणध्वनीद्वारे विनंती करीत होती.

(father corona treatment daughters attempt but father death)

दुसऱ्याच दिवशी श्री. महाले यांनी पाच हजार रुपये मोहिनीचे वडील शिवदास गायकवाड यांच्या बँक खात्यावर पाठवून दिले. आठ दिवसांपूर्वीची ही घटना. वडील कोरोनातून (Corona) बरे व्हावेत, यासाठी ती रोज देवाचा धावा करीत होती. मानवाचे हदय पिळवून टाकणाऱ्या तिच्या अश्रूंचा मात्र नियतीवर परिणाम झाला नाही. २ जूनला शिवदास गायकवाड यांचे निधन (Death) झाले. भविष्याप्रति चिंतेने रडून रडून मोहिनीचे अश्रूही संपले.


परिस्थीती हालाकीची..

शिवदास गायकवाड मिळेल ते काम करून वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा व तीन मुली अशा सात सदस्यांच्या कुटुंबांचा गाडा कसाबसा चालवीत होते. मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, म्हणून उसनवार रक्कम घेऊन त्यांनी मोठ्या मुलीला मोहिनीला मोबाईल घेऊन देत ऑनलाइन शिक्षणात खंड पडू दिला नाही. अचानक मोहिनीच्या आई व वडिलांना कोरोनाची लागण झाली. हातात फारसे पैसे नसल्याने गावातच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, आजार वाढत गेल्याने पैशांची निकड भासू लागली. सर्व जबाबदारी लहानशा मोहिनीवर आली. घरचे सर्व आवरून तसेच आई-वडिलांना डबा बनवून देणे तो पोचविणे आदी दैनंदिन कामासह पैशांची तजवीज करण्याचे कामही तिलाच करायचे होते. काय करावे, कोणाकडून पैसे मागावे, तिला चिंता वाटू लागली. शाळेत शिक्षक परोपकार, खरे बोलणे, आज्ञापालन, शिस्त व आई-वडिलांची सेवा आदी मूल्यशिक्षण देतात. त्यामुळे शिक्षकांची एक आदर्श छबी डोळ्यासमोर ठेवून तिने शिक्षक महालेंकडून पाच हजार रुपये मागण्याचा हिय्या केला. पैसे मिळताच आई-वडिलांवर उपचारासाठी धाव घेतली.

death

आणि बापाचे छत्र हरपले..

मात्र, तिच्या धावपळीला यश आले नाही. आईला आता बरे वाटत आहे, पण कमावता बापच गेल्याने तिच्या डोक्यावरचे छत्रच हरविले. वृद्ध आजी-आजोबांची एकमेव आधाराची काठी असलेल्या वडिलांचे निधन झाल्याने मोहिनीच्या आकांताने वैऱ्यालाही रडू येईल, अशी स्थिती होती. आता आपले शिक्षण व भविष्य दोन्हीही संकटात असल्याची जाणीव तिला असावी. अशा वेळी एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी तिला धीर देत आवश्यक त्या वेळी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT