उत्तर महाराष्ट्र

सोळा होतकरूंना वधू मिळवून देणारा अवलिया !

एल. बी. चौधरी

सोनगीर : राज्यात ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना तेजीत असून, लग्न जमलेले व वधू-वर व आप्तेष्ट मंडळींत निरुत्साह आहे. अनेक विवाहेच्छूंना यंदाही वधू मिळाली नसल्याने त्यांचे एक वर्ष पुन्हा वाया गेले आहे. राज्याच्या आर्थिकदृष्ट्या मागास भागातील वधू शोधण्यासाठी अशा युवकांची भटकंती सुरू झाली आहे. वधूसाठी दलालांना दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागत असून, वेगवेगळ्या दलालांची किंमत वेगवेगळी आहे. अशा परिस्थितीत येथील तांबट व बांगडी कासार समाजातील निर्व्यसनी, कष्टाळू व चांगल्या युवकांना वधू मिळवून देण्याचे एक वेगळे पुण्याचे काम येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश पंडित कासार करीत असून, आतापर्यंत १६ युवकांना त्यांनी बोहल्यावर चढविले आहे. अर्थात सर्व वधू परजातीच्या व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. 

आजही मुलामुलींमध्ये भेद पाळले जात असल्याने राज्यात हजार पुरुषांत ९२२ स्त्रिया असे प्रमाण आहे. परिणामी गावोगावी अविवाहित युवकांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. नोकरीच पाहिजे या वधूपालकांच्या हट्टापायी अनेक होतकरू युवकांना मुलगी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आपणही समाजाचे काही देणे लागतो या दृष्टिकोनातून रमेश कासार यांनी समाजातील कष्टाळू युवकांचे लग्न लावून देण्यासाठी जिवाचे रान केले. ते स्वतः एक पैसाही न घेता पाच वर्षांपासून युवकांचे लग्न जमवून देत आहेत. पहिली एक-दोन लग्ने यशस्वी झाल्याने वधूपित्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. रमेश कासार फसविणार नाहीत ही खात्री झाल्याने ते सांगतील त्याला मुलगी देताना वधूपालक जास्त विचार करीत नाहीत.
 

नुकतेच त्यांनी १६ वे लग्न लावून दिले. कोरोनामुळे मोजके पाहुणे उपस्थित होते. त्या वेळी रमेश कासार यांच्या आगळ्यावेगळ्या कार्याबद्दल समाजाने त्यांचा सत्कार केला. होतकरू युवकांचे परजातीतील गरीब घरातील विशेषत: राज्याच्या सीमेवरील गावातील मुलींशी विवाह लावणे हे सामाजिक एकतेसाठी गरजेचे आहे. गरिबीत खितपत पडलेल्या या मुलींनाही तुलनेने श्रीमंत सासर मिळत असल्याने त्या समाधानी आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

Raigad Flood : रायगडमध्ये मुसळधार पावसाने कहर; सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्यापलीकडे, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT