bibtya attack 
उत्तर महाराष्ट्र

बिबट्याने चढविला हल्‍ला पण..

सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : तळोद्यातील कोर्टाच्या मागील बाजूला असलेल्या शेतात बिबट्याने गाईच्या वासरु वर हल्ला केला. परंतु शेतातील राखणदाराचा कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने वासरु सोडून तेथून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात वासरु जिवंत असून फक्त त्याच्या गळ्याला जखम झाली आहे. रहिवासी क्षेत्रात बिबट्याच्या वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळोद्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला व कोर्टाच्या मागील बाजूस विलास भिकाजी सूर्यवंशी यांचे शेत असून त्यात त्यांनी केळीची लागवड केली आहे. विलास सूर्यवंशी यांनी राखणदार ठेवला असून तो व त्याचे कुटुंब शेतातच राहतात. राखणदाराचा झोपडी शेजारीच गाईंसाठी गोठा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात गाई व वासरु बांधून राखणदार व त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेले हेाते.

दबक्‍या पावलांनी बिबट्याचा हल्‍ला
बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरुवर हल्ला केला. परंतु राखणदारच्या पत्‍नीला आवाज आल्याने ती उठून गोठ्याचा दिशेला गेली असता तिला बिबट्याने वासरुवर हल्ला केल्याचे दिसून आले. तिने आरडा ओरडा केल्यावर आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यानंतर बिबट्याने वासरु सोडून तेथून पळ काढला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात वासरुच्या गळ्यात जखम असून वासरु जिवंत आहे. 

यापुर्वीही केला होता हल्‍ला
आधीही या शेताला लागून असलेल्या एक ते दोन किलोमीटरचा परिसरातील शेतांमध्ये बिबट्याने शेतातील पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता तर थेट रहिवासी क्षेत्राला लागून असलेल्या शेतातच बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT