उत्तर महाराष्ट्र

चक्क सत्ताधारी उपनगराध्यक्षांवर आली उपोषणाची वेळ ! 

सम्राट महाजन

तळोदा ः शहरातील विकास कामांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत तसेच सत्ताधारी उपनगराध्यक्षा असून देखील प्रभागातील विविध विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या आरोप करीत भाग्यश्री चौधरी यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेच्या दिवशीच एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले, यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देखील दिले. मात्र सत्ताधारी उपनगराध्यक्षा यांनाच उपोषण करावे लागल्याने शहरात चर्चा रंगली होती. 

पालिकेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, तळोदा नगर पालिकेच्या हद्दीतील प्रभाग एक मध्ये विविध विकास कामांना तांत्रिक मान्यता देण्यास जाणीवपूर्वक विलंब होतो, मात्र इतर प्रभागात त्वरित कार्यवाही होते. हा प्रकार कोणाच्या दबावाखाली होतो याचा खुलासा करण्यात यावा. प्रभाग एक मध्ये उत्कृष्ट दर्जाची विकास कामे होऊन देखील ठेकेदाराला देयके देण्यात विलंब होतो. आमराई फळीचा पूल अद्याप पावेतो मंजूर करण्यात आलेला नाही. तळोदा शहरात लावण्यात आलेले सौरपथदिवे अवघे चार तास चालतात, या बाबतीत तक्रार करून देखील दखल घेण्यात आली नाही.

मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण

तसेच प्रभागातील विविध ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे, पुलाचे बांधकाम करणे व अमरधाम बांधणे आदी कामे होण्यासाठी तीन वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक मान्यतेसाठी फी भरण्यासाठी नगरपालिका फंडात पैसे नाहीत असे उत्तर मिळते. पाणी पुरवठा विभागाचे नारायण चौधरी हे नेहमी बांधकाम विभागात असतात, त्यावर कार्यवाही करावी तसेच कॉलेज चौफुली ते आंबेडकर चौक पावेतो भूमिगत गटार बाबत ठराव होऊन तीन वर्षे उलटले तरी अजूनही त्या कामास मंजुरी नाही. नगरपालिकेच्या इमारती समोरील अतिक्रमण काढण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील निवेदनातून उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी दिला आहे. 

प्रभाग एक मध्ये विविध विकास कामांसाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच प्रभागात रस्त्याचे काम सुरुच आहे. पथदिवे संदर्भात संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून ऑडिट झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यात येणार नाही. 
-सपना वसावा, मुख्याधिकारी, तळोदा पालिका. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

१२ चौकार, १३ षटकार! वैभव सूर्यवंशीच्या भीडूचे ३२ चेंडूंत शतक; राजस्थान रॉ़यल्सचा फलंदाज IPL 2027 मध्ये यशस्वी जैस्वालच्या जागी खेळणार?

Chhatrapati Sambhajinagar: १८ दिवसात २० छापे, कोट्यवधींचा माल जप्त; १४ जणांना अटक, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT