उत्तर महाराष्ट्र

युवकांकडून विहिर पुनर्भरणाचा उपक्रम...भूजल पातळी वाढण्यास होणार मदत 

सकाळवृत्तसेवा

तळोदा  : येथील कालिकादेवी गल्लीतील युवकांनी एकत्र येत गतवर्षी लोकसहभागातून जुन्या विहिरीच्या जलपुनर्भरणचा उपक्रम राबविला होता. यावर्षी देखील युवकांनी एकत्र येत त्या विहीरीची आवश्यक ती डागडुजी करीत तिची साफसफाई केली अन पुनर्भरणास सुरुवात केली आहे. यामुळे विहिरीचा परिसरातील पावसाचे वाहून जाणारे पाणी विहिरीत मुरणार असून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. 

शहरातील कालिकादेवी गल्लीतील जुनी विहीर अनेक वर्षांपासून बुजविण्यात आली होती. रस्त्याच्या काँक्रीटीकरणात ती कुठे होती हे देखील सांगता येत नव्हते. मात्र पाण्याचे महत्व व आजच्या परिस्थितीत पाणी जिरवणे आवश्यक आहे हे हेरुन कालिकादेवी गल्लीतील तरुण, ज्येष्ठ मंडळी एकवटले आणि त्यांनी लोकसहभागातून निधी जमवून जाणकारांना विहिरींची जागा विचारुन तिचे खोदकाम केले. त्यात पाईपलाईन टाकून गल्लीतील पाणी विहिरीपर्यंत जाण्याची सोय मागील वर्षी केली होती. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी विहिरीत जिरले होते. हा अनुभव घेवून पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून पावसाचे पाणी वाहून न जाऊ देता ते अडविणे व जिरवणे महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन युवक यंदा पुन्हा एकत्र आले. त्यांनी त्या विहिरीची आवश्यक ती डागडुजी करीत तिची साफसफाई केली व यावर्षी सुध्दा विहीर पुनर्भरणास सुरुवात केली आहे. 


तळोदा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे भुजलावरच अवलंबून आहे. शेतीसाठीही पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परिसरात कोणतेही मोठे धरण नाही, सिंचन योजना नाही. म्हणून जलपुनर्भरण करण्याशिवाय परिसरात दुसरा मार्ग नाही. त्यामुळे युवकांच्या उपक्रमाचे राबविण्यात सुरुवात केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

बोअरवेलला फायदा होईल 
कालिकादेवी गल्ली, मगरे चौक व आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणारी बोअरवेल देखील पुनर्भरण करण्यात आलेल्या विहिरीचा जवळच आहे. विहिरीमध्ये पाणी जिरले तर भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. भविष्यात त्याचा फायदा बोअरवेलला होईल, बोअरवेलचे पाणी दीर्घकाळ टिकेल व त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहील अशी अपेक्षा कालिका देवी गल्लीतील युवकांनी व्यक्त केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT