tarsod fagne road 
उत्तर महाराष्ट्र

अखेर या रस्त्याचा मुहूर्त सापडला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या तरसोद ते चिखली या पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. दुसरीकडे आता रखडलेल्या तरसोद ते फागणे दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचेही चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. अतिपावसामुळे सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात कामांत खंड पडला होता. मात्र, नोव्हेंबरच्या मध्यापासून चौपदरीकरणाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. 

जानेवारीपासून तरसोद ते फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद होते. एमबीएल इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने बॅंक गॅरंटी न दिल्याने तब्बल दोन महिने काम रखडले होते. नंतर हे काम विविध कारणांनी रखडत गेले. पावसाळ्यात अतिपावसाने महामार्गावर काम करता आले नाही. आतापर्यंत ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर नोव्हेंबरपासून कामास गती घेतली आहे. तूर्त टेक्‍निकल डिपार्टमेंटचे शंभर ते दीडशे लोक काम करताहेत. प्रत्यक्ष फिल्डवर सव्वाशे कामगार कार्यरत आहेत. 

कामाचा वेग वाढविण्याची गरज 
पाळधी ते फागणे दरम्यानचा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर रोज अपघात होतात. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. रात्रंदिवस काम सुरू झाले तर काम पूर्णत्वास लवकर येईल व वाहतुकीसाठी मार्ग मोठा होईल. परिणामी, अपघात होणार नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

फागणे ते तरसोद : 87.3 कि.मी. 
अपेक्षित खर्च : 940 कोटी रुपये 
मक्तेदार कंपनी : ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT