शेंदुर्णी (ता .जामनेर ) : शुक्रवारी रात्रीपासून शेंदुर्णी परिसरात मुसळधार पावसाने सुरूवात केली असून त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. शेंदुर्णी परिसरात सतत दहा तास पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, शेंदुर्णी- सोयगाव गावाचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता.1) रात्री जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सोन नदीला महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही घरांची पउझडही झाली. अनेक घरे, दुकाने पावसाच्या पाण्याने जलमय झाली. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कापसाचा थोडाफार हंगाम हातात येईल; अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची ती आशाही पूर्णतःसंपुष्टात आली आहे.
व्यापाऱ्यांचेही करोडो रुपये पाण्यात
बऱ्यांच व्यापाऱ्यांनी नेहमीच्याच शेतकऱ्यांना खते, बी- बियाणे, किटकनाशके उधार दिलेली असतात. शेंदुर्णी व परिसरातून त्यांची उलाढाल केरोडोच्या घरात असते. हंगाम आल्यावर शेतकरी त्याच व्यापाऱ्याला माल देऊन किंवा माल विकून त्यांची देणी देऊन रब्बीसाठी बिजवाईची उचल करीत असतात. मात्र यंदा व्यापाऱ्यांचीही येणे बाकी रब्बीनंतर येईल अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.