उत्तर महाराष्ट्र

नेटवर्क नसलेल्या केंद्रांवर वॉकीटॉकी द्या: निरीक्षकांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आज निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. 
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदान केंद्रनिहाय नियोजनाबाबत पूर्वतयारीची माहिती दिली. तसेच पोलिस अधीक्षक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील मतदान केंद्रावरील पोलिस बंदोबस्ताचे केलेले नियोजन, चेकपोस्टवरील नाकाबंदी आदींच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. 
निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनास देण्यात आल्या. ज्या मतदान केंद्रावर नेटवर्क उपलब्ध नाही तेथे वॉकीटॉकीसह आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच अशा मतदान केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. पोलिस चेकपोस्ट, नाकाबंदी, सीमावर्ती भागातील गस्त व तपासणी वाढविण्याच्याही सूचना दिल्या. संवेदनशील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे वेबकास्टींग करावे तसेच ज्या मतदान केंद्रावर वेबकास्टींग शक्‍य नसेल तेथे व्हिडिओग्राफर ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच उमेदवारांच्या गावांतील मतदान केंद्रावरील सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्‍यकता भासल्यास तेथे विशेष बंदोबस्ताचे नियोजन करावे असेही निवडणूक निरीक्षकांनी सांगितले. 
बैठकीस निवडणूक निरीक्षक रूपक मुजुमदार, नरेंद्रसिंह पटेल, पुनीत गोयल, गौरव बोथरा, निवडणूक पोलिस निरीक्षक अहमद खुर्शिद, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह निवडणूक शाखेचे इतर अधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीला तिसरा धक्का! आर अश्विनला मिळाली सामन्यातील दुसरी विकेट

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT