wadwe dayrria imege
wadwe dayrria imege 
उत्तर महाराष्ट्र

वढवे गावामध्ये ४० जणांना डायरीया 

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगरः तालुक्यातील वढवे येथे डायरियाची लागण झाली असून ४० जण अत्यवस्थ झाले आहेत. गावात आरोग्य पथक दाखल झाले आहे. खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील व जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी गावात तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. आरोग्य अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. 

वढवे गावातील पाणीपुरवठा होत असलेल्या स्रोताच्या ठिकाणी शौचास बसत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून ही घाण थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहचत आहे. या जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागल्याने दूषित पाणीपुरवठा झाल्याने डायरियाची लागण झाली आहे. यात वंदना लक्ष्मण पाटील (वय ४७), तनवी रमेश चौधरी (वय १५), मोहिनी संजय पाटील (वय १३), नामदेव संपत पाटील (वय ६२), कविता विनोद पाटील (वय ३५), सुपडाबाई काशिनाथ पाटील (वय ६१), योगेश उमेश सोनवणे (वय ३०), मिराबाई न्यानेश्वर पाटील (वय ३५), या आठ जणांवर वडगाव येथे तर शोभा कोळी, भूमिका चौधरी, मालतीबाई पाटील, सुनंदा पाटील, माधुरी कोळी, मयूरी कोळी, संगीता चौधरी, रेणुका पाटील, शरद चौधरी, नयना कन्हेरे, संगीता पाटील, माया कोळी, वंदना पाटील, जाईबाई पाटील, गजेंद्र पाटील, भगवान कोळी, सरला पाटील, अनिता पाटील, गोपाळ चौधरी, मधुकर पाटील, गयाबाई कोळी, उषा जाधव, सविता चौधरी, उषा पाटील, नंदा पाटील, अजय पाटील यांच्यासह ४० जण डायरियामुळे बाधित झाले आहेत. सर्व उपचार घेत आहेत. गळती शोधून ते जोडण्यात आलेले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी वढवे येथे तसेच मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची पाहणी केली. तालुका वैद्यकीय अधिकारी नीलेश पाटील तसेच डॉक्टर योगेश राणे यांना योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले.  आज जळगाव येथील आरोग्य पथक वढवे तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे दाखल होणार असल्याची माहितीही देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT