lady doctor 
उत्तर महाराष्ट्र

जे कोणी करू शकले नाही ते करून दाखविले या महिला डॉक्‍टरने... 

राजू कवडीवाले

यावल : देशाला स्वातंत्र्य मिळवून 73 वर्षांनंतर प्रथमच सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी बघितला डॉक्‍टर... सातपुडा पर्वतातील जंगलातून अरुंद पायवाट, डोक्‍यावर तापणार भर दुपारच ऊन्ह आणि पाठीवर औषधी भरून बॅग घेऊन जाणारी ध्येयवेडी डॉक्‍टर. थेट पायी प्रवास करून, आदिवासी बांधवांना अन्न, धान्य देऊन माणुसकी जपली किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी. आजपर्यंत जे कोणी करू शकले नव्हते; ते डॉ. मनिषा महाजन या महिला डॉक्‍टराने करून दाखविले. यामुळेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कुणी डॉक्‍टर अतिदुर्गम भागात पोहचल्याची भावना आदीवासी बांधवांनी व्यक्त केली. 

जेव्हा जग एकीकडे कोरोनाशी युद्ध लढत आहे, त्याच वेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त माणुसकी हा धर्म पाळत स्वतःला झोकून काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी साधारणतः 85 किमीवर असलेले सग्यादेव आणि माथन हे सातपुडा पर्वत रांगांमधील दोन आदिवासी पाडे गाठले. हे आदिवासी पाडे किनगावपासून (ता. यावल) सुमारे 85 किमी दूर पर्वत रांगामध्ये वसलेले आहेत. सग्यादेव येथे जायचे ठरले; तर सातपुडा पर्वत रागांमधून प्रवास करत रुईखेडापर्यंत आणि तेथून पुढचा अधिक खडतर प्रवास दहा किमीचा पायी करावा लागतो. 

महिला असूनही दाखविली हिंम्मत 
जंगलातून जाताना अरुंद रस्ता पायवाट, डोक्‍यावर भर उन्ह आणि पाठिवर औषधाची बॅग... पाय घसरला तरी खोल दरीत माणुस पडू शकतो. त्यात जंगली प्राण्यांचा वावर; असे असताना सुद्धा डॉ. मनिषा महाजन यांनी कशाचाही विचार न करता, महिला असून सुद्धा न घाबरता, सेवा देण्यासाठी पायीच मार्ग गाठला. 

पाड्यावर डॉक्‍टर पोहचले नव्हते 
आजवर कोणताच डॉक्‍टर या तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या पाड्यावर कधी फिरकला नाही. म्हणून डॉ. मनीषा महाजन यांनी व्यवस्थित नियोजन करून तेथे जाण्याचा ध्यास ठेवत आदिवासी पाडा गाठला. जवळपास स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर तेथील लोकांनी डॉक्‍टर प्रथमच पहिला. तेथे जाऊन लसीकरण, आरोग्य तपासणी आणि कोरोना जनजागृती केली. त्याच वेळेस एका स्वयंसेवी संस्थेमार्फत अन्न- धान्य वाटप करून डॉ. मनीषा महाजन आणि त्यांची संपूर्ण टीम रात्री उशिरा सुखरूप घरी पोहचले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT