residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

पाणीपुरवठ्याची बनवा बनवी अशी ही बनवाबनवी.....

विक्रांत मते

नाशिक : शहरात प्रतिदिन 430 दशलक्ष पाणी पुरवठा होत असल्याचा पाणी पुरवठा विभागाने यापुर्वी केलेला दावा पालिकेच्याचं अहवालावरून खोटा ठरला असून शहराला दररोज सुमारे साडे तीनशे दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जितका पाणी पुरवठा होतो त्याच्या दोनशे दशलक्ष लिटर्स पाण्यावरचं कर आकारणी होत असल्याने याच चुक नागरिकांची नसून महापालिकेचे असताना नाशिककरांच्या माथी खापरं फोडण्याचे उद्योग पालिकेकडून सुरु आहे. 
सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या पुर्व विभागात अधिक पाणी पुरवठ्याची गरजं असताना सर्वात कमी पुरवठा येथेचं होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी गंगापुर व दारणा नदीवरील चेहेडी बंधारा येथुन कच्च्या स्वरुपात 430 दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. त्यावर शिवाजी नगर, बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड अशा सहा जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. अठराशे किलोमीटर लांबीच्या जलवाहीन्यातून 103 जलकुंभामध्ये पाणी भरून तेथून वीस लाख लोकांना पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा विभागाने आतापर्यंत शहरात 430 दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होत असल्याचा दावा केला आहे. परंतू धरणांमधून उचलले जाणारे पाणी व त्यावर प्रक्रिया होण्यापासून घरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यात मोठी तफावत असल्याचे पाणी परिक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. घरापर्यंत अवघे 351.82 दशलक्ष लिटर्स पाणी पोहोचते तर पालिकेच्या जलवाहीन्यांमधून 78.18 दशलक्ष लिटर्स पाण्याची गळती होते. 

निम्मीचं कर आकारणी 
शहरात 351 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असताना फक्त दोनशे दशलक्ष लिटर्स पाण्यावरचं कर आकारणी होते. कर आकारणी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या विविध कर विभागाची आहे परंतू नागरिकांना वेळेत देयके पोहोचतं नाही. मनुष्यबळ कमी असल्याने सरासरी देयके अदा केली जातात. वर्षातून दोनदा देयके देणे गरजेचे असताना एकदाचं देयके अदा होत असताना देखील नागरिकांवर अपयशाचे खापर फोडून मीटर नादरुस्त असल्याचे व अनेक ग्राहकांकडे पाणी मीटरचं नसल्याचा दावा करतं कारवाईचे ईशारे देण्यात आले आहे. 

पुर्वेत सर्वात कमी पाणी 
शहरात पंचवटी पाठोपाठ सिडको विभागात सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. पश्‍चिम व सातपूर विभागात सर्वाधिक कमी पाणी पुरवठा होत असल्याचे कागदोपत्री दिसतं असले तरी लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता पुर्व विभागात सर्वात कमी पाणी पुरवठा होत असल्याचे दिसते. सातपूर विभागात गावठाण व अशोक नगरचा भाग सोडला तर उर्वरित भागात एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा होतो. पश्‍चिम विभाग शहरात सर्वात कमी लोकसंख्येचा भाग आहे. पुर्व विभागात जुने नाशिक पासून उपनगरपर्यंतचा भाग येतो. शहराच्या एकुण लोकसंख्येचा तीस ते 35 टक्के लोकसंख्या पुर्व विभागात सामावली आहे त्यामुळे येथे अधिक पाणीपुरवठा होण्याची गरज असताना दुर्लक्ष होते. 

 शहरात एक लाख 89 हजार 53 नळजोडण्या. 
- 351 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा. 
- 200 लिटर्सवरचं होते कर आकारणी. 
- शहरात एकुण पाणी गळती 43 टक्के. 
--
विभागनिहाय पाणी पुरवठा 
विभाग प्रतिदिन पाणी पुरवठा (दशलक्ष लिटर्स मध्ये) 
पुर्व 51.47 
पश्‍चिम 44.12 
पंचवटी 74.82 
नाशिकरोड 66.63 
सिडको 74.80 
सातपुर 39.98 
---------------------------------------------------- 
एकुण 351.82 
---------------------------------------------------- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT