bjp
bjp esakal
उत्तर महाराष्ट्र

Market Committee Election Analysis : भाजपला अंतर्गत रस्सीखेच भोवली; आत्मपरीक्षणाची वेळ

धनराज माळी

Market Committee Election Analysis : कधी नव्हे एवढ्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला अपयशाला सामोरे जावे लागले. ही भाजपच्या जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाला धक्का देणारी बाब आहे.

याला कारणीभूत भाजपच्याच कार्यकर्त्यांमधील अंतर्गत रस्सीखेच व पदाची लालसा बाळगणारी फळीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे केंद्र, राज्य व जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व असताना साध्या बाजार समितीतील हा पराभव खरोखरच भाजप नेते व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. (Market Committee Election Analysis BJP faces an internal tug of war Time for introspection nandurbar news)

यंदा बाजार समिती निवडणुकीस खूपच महत्त्व प्राप्त झाले. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता व जिल्ह्यात भाजपचे मंत्री, खासदार भाजपचे, जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे त्यामुळे सत्तेचे केंद्र भाजप व डॉ. गावित परिवार असल्याने निवडणूक जिंकणे सोपे होईल असे साऱ्यांनाच वाटू लागले.

कारण त्यांनी केलेली कामे जमेची बाजू होती. त्यामुळे नवापूर, शहादा व नंदुरबार या तीन बाजार समित्यांवर विशेष लक्ष केंद्र करीत पालकमंत्री डॉ. गावित यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले.

शहाद्यात दीपक पाटील भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांचीच एकहाती सत्ता होती. निवडणुकीच्या बैठकीत त्यांनी एकला चलो रे केले. मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह इतर नेत्यांना त्यांनी विश्‍वासात घेतले नाही.

त्यामुळे मंत्री डॉ. गावित यांनी शहाद्यात जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल निवडणूक रिंगणात उतरविले. म्हणजेच भाजपचेच दोन पॅनल झाले. त्यात दीपक पाटील यांच्यापाठोपाठ डॉ. गावित यांनीही अभिजित पाटील व जयपाल रावल यांना विश्‍वासात घेतले नाही.

त्यांना डावलले गेले अशी चर्चा आहे. त्यामुळे श्री. पाटील व रावल दोन्हीकडून डावलले गेले. डावलेले गेलेले हे दोन्ही नेते आतापर्यंत कट्टर राजकीय विरोधक होते. अभिजित पाटील यांनी उमेदवार रिंगणात उतरवून तत्पूर्वी दोंडाईचाच्या गढीवर जाऊन आशीर्वाद घेतले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तेथून आल्यावर सर्व मतभेद बाजूला सारून जयपाल रावल यांची भेट घेऊन निवडणुकीत सहकार्य करण्याचे सांगितले. त्यावर श्री. रावल यांनी सकारात्मक भूमिका घेत मदतीचा हात पुढे केला. तसेच भाजपचे प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित यांनीही अभिजित पाटील यांना साथ दिली.

म्हणजेच दीपक पाटील व डॉ. गावित यांच्यावर नाराज असलेल्यांचा व भाजपशी कनेक्टेड पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एक भक्कम तिसरा गट तयार झाला. त्यात अभिजित पाटील यांनी समाजाला दिलेल्या मदतीच्या हाकेला साद मिळाली.

त्यातच अभिजित पाटील यांचे शेतकऱ्यांचा प्रश्‍नांवर सुरू असलेले कामही जमेची बाजू ठरली. त्यामुळे शहाद्यात प्रस्थापित दीपक पाटील यांना तीन जागा राखत सत्ता गमवावी लागली, तर डॉ. गावित गटालाही एका जागेवर समाधान मानावे लागले. तसेच नवापूर बाजार समितीत भाजपला सात, तर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या. तेथे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सत्ता कायम राखली.

सभापतीचा मुद्दा ठरला कळीचा

नंदुरबार बाजार समितीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्ताधारी गटाविरुद्ध युवा नेते डॉ. विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. बेरजेचे गणित करीत नंदुरबार बाजार समिती जिंकणे सहज सोपे असल्याचे गणित मांडले गेले. तसे नियोजनही झाले.

सर्वांनी मेहनतही केली. मात्र विजयानंतर सभापती कोण, या मुद्द्यावरून आपसातच रस्सीखेच सुरू झाली होती. त्यामुळे हा निवडून आला तर तो सभापती मग आमचे काय, प्रश्‍न उपस्थित करणारे सत्तेची लालची मंडळी एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्नात होती. त्यामुळेच नंदुरबार बाजार समितीत अंतर्गत रस्सीखेचमधून पूर्णपणे अपयशाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT